Petrol  Dainik Gomantak
गोवा

इंधनाच्या वाढत्या किमतींवरुन कॉंग्रेसने भाजपला धरले धारेवर

पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून किमती नियंत्रण ठेवण्याची मागणी कॉंग्रेसने केली आहे.

Akash Umesh Khandke

मडगाव: गोव्यात मागील चार दिवसांत इंधनाचे दर तिसऱ्यांदा वाढले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करून किमती नियंत्रण ठेवण्याची मागणी कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षाकडे शुक्रवारी केली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस आणि आमदार युरी आलेमाओ यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “असंवेदनशील भाजप सरकार आता पेट्रोल (Petrol), डिझेल आणि गॅसच्या किमतीत झपाट्याने वाढ करून सर्वसामान्यांना आर्थिक धक्का दिला आहे. डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant), ज्यांनी 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटासाठी करमाफीची घोषणा केली होती, त्यांनी आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती `80 प्रती लिटरवर मर्यादित ठेवण्यासाठी व्हॅट कमी केला पाहिजे.

भाजप (BJP) सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरातही वाढ केली आहे, हे धक्कादायक आहे. प्रमोद सावंत यांनी लक्षात ठेवावे की काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार तरुण आणि उत्साही आहेत. जनतेच्या भावनांशी खेळू नका, असा इशारा आम्ही सरकारला देतो. आगामी विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही जोरदार आवाज उठवू, आलेमाओ म्हणाले.

पक्षाच्या जाहीरनाम्याचा संदर्भ देत आलेमाओ म्हणाले, आम्ही जाहीरनाम्यात गोव्यातील जनतेला पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 रुपये प्रतिलिटर ठेवण्याचे आश्वासन दिले होते. आमचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी हे वचन देण्यापूर्वी आर्थिक पैलूंचा योग्य अभ्यास केला होता. व्हॅट खाली आणणे आणि किंमतींवर मर्यादा घालणे शक्य आहे, जर सरकारची इच्छा असेल तर ते किमती कमी करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT