Vijai Sardesai, Goa Forward Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: 'काँग्रेससोबत 2027 पर्यंत युती! राहुल गांधींना तसे आश्वासन दिलेय', विजय सरदेसाईंची स्पष्टोक्ती

Goa Congress Forward Alliance: ज्याप्रकारे विकासकामे सुरू आहेत त्यांचे काम पाहता ही कामे कधी पूर्ण होणार याचा लोकांना प्रश्न पडला आहे, हे लोकांशी सवांद साधल्यानंतर कळल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले.

Sameer Panditrao

केपे: काँग्रेस पक्षाबरोबर आमची २०२७ पर्यंत युती असून तसे आश्वासन मी राहुल गांधींना दिले आहे. ‘संविधान बचावा’ची आज नितांत गरज असून सावंत यांचे सरकार जर संविधानविरोधी चालत असेल तर संविधानाचा बचाव करणे गरजेचे असून काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने मीही त्यांच्या या कार्यात सहभागी असल्याचे फातोर्डाचे आमदार व गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

कुडचडे शहराचा विकास सरकार करू पाहत आहे त्याला लोकांचा पाठिंबा नाही. ज्याप्रकारे विकासकामे सुरू केली आहेत त्यांचे प्रत्यक्ष काम पाहता ही कामे कधी पूर्ण होणार याचा लोकांना प्रश्न पडला आहे, हे लोकांशी सवांद साधल्यानंतर कळून आल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले. कुडचडे येथे आयोजित केलेल्या ‘आमचो आवाज विजय’ कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांच्याबरोबर नगरसेवक बाळकृष्ण होडरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. लोकांनी आज कुडचडे येथील मलनिस्सारण प्रकल्पाला आपला विरोध असल्याचे सांगितले. लोकांना विश्वासात न घेता असे अनेक प्रकल्प सुरू केले आहेत त्यांना लोकांचा विरोध आहे.

मलनिस्सारण प्रकल्प झुआरी नदीच्या फाट्याच्या कडेला सुरू करण्यात आला असून यासाठी हजारो खारफुटीची झाडे नष्ट केली आहेत याविषयी अनेकवेळा आवाज उठवूनही काहीच होत नसल्याचे लोकांनी सांगितले. कुडचडेतील रस्ते मृत्यूचे सापळे बनले असल्याचे लोकांनी सांगितले आहे. हे सर्व प्रश्न मी विधानसभेत मांडणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

तर, सभा पुढे ढकलली असती!

कुडचडे येथे आज काँग्रेस पक्षाची ‘संविधान बचाव’ ही सभा होती तसेच सरदेसाई यांचीही सभा होती. त्यावर बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, आमचा हा कार्यक्रम पक्षाचा नसून तो पूर्णपणे खासगी आहे; कारण मी विधानसभेत लोकांचे प्रश्न घेऊन जाणार आहे, त्यासाठी लोकांशी संवाद साधून लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे व आजची सभा हा त्याचाच एक भाग होता. जर पाटकर यांनी आम्हाला सांगितले असते तर हा कार्यक्रम उद्या अयोजित करण्यास माझी कोणतीच हरकत नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best Destination For Solo Travel: सोलो ट्रिपसाठी परफेक्ट! महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी 'ही' टॉप ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

Railway Accident: पत्नी दारूच्या नशेत रेल्वे ट्रकवर बसली, वाचवायला गेलेल्या पतीचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू; वेरोड्यातील दुर्घटना

Sal: भेडशीत तिळारी, दोडामार्गात मणेरी नावाने ओळखली जाणारी गोव्यातील शापुरा नदी; सौंदर्यसंपन्न बनलेला 'साळ गाव'

Mapusa Theft: पुन्हा त्याच ठिकाणी चोरी! दिवसाढवळ्या दुचाकी लंपास, म्हापसा बनतंय का चोरट्यांचे राज्य?

हणजूण येथे पर्यटकांच्या वाहनाची ट्रान्सफॉर्मरला धडक; दारूच्या बाटल्या सापडल्याने संशयाचे वातावरण!

SCROLL FOR NEXT