Ferry Boat Fare Dainik Gomantak
गोवा

Ferry Boat Fare: फेरीबोट शुल्कावरून कॉंग्रेस आक्रमक! कुंभारजुवेत आंदोलनाचा इशारा

फेरीबोटवरील शुल्कावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.

Kavya Powar

Ferry Boat Fare: फेरीबोटवरील शुल्कावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात असून शुल्क हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यातच कुंभारजुवे कॉंग्रेस गट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला.

आज (रविवारी) सकाळी 10.30 वाजता ओल्ड गोवा फेरीबोट पॉईंटजवळ कॉंग्रेसतर्फे आंदोलन सुरू करण्यात आले असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

16 नोव्हेंबरपासून शुल्काचे नवे दर लागू होणार असताना विरोधी पक्षाने सरकारला घेराव घातला आहे. नवीन दरांनुसार दुचाकींसाठी प्रति ट्रिप 10 रुपये आकारले जातील, तर दुचाकींच्या अमर्यादित फेऱ्यांसाठी मासिक पास 150 रुपये निश्चित करण्यात आला आहे.

तीनचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी, प्रति फेरीलीचा दर 40 रुपये आहे आणि मासिक पाससाठी 600 रुपये अशी शुल्क आकारणी सरकारतर्फे करण्यात आली आहे.

जर सरकारने ही अधिसूचना मागे घेतली नाही तर आंदोलन नदी जलवाहतूक विभागावर नेणार असल्याची माहिती कॉंग्रेसतर्फे देण्यात आली.

दुसरीकडे, या शुल्कावर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने आक्षेप घेतला आहे. फेरीबोट चालणाऱ्या कित्येक ग्रामीण भागातील लोकांवर हा अन्याय असल्याचे आरजीचे नेते अजय खोलकर म्हणाले.

गुरुवारी पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर फेरीबोटीतून वाहने नेण्यास शुल्क लावल्याने खरमरीत टीका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Market: म्हापसा मार्केटचा पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार, 3 टप्प्यांत चालना; 20 कोटी रुपये खर्च अपेक्षित

Goa Youth Festival: पणजीत युवा महोत्सव, 1 ते 2 डिसेंबर रोजी कला अकादमीत आयोजन; 10 हजार तरुण सहभागी होणार

Tiger Reserve Controversy: नेत्रावळीतील समस्‍या कधी सोडविल्‍या का? व्‍याघ्र प्रकल्‍पावरून केवळ निर्बंध थोपवले; वास्‍तव तपासा, ग्रामस्‍थांची मागणी

Shriram Digvijay Yatra: श्रीराम दिग्विजय यात्रेचे पर्तगाळी मठात आगमन, आतषबाजीने रथाचे स्वागत; मठानुयायी, भाविकांत उत्साहाचे वातावरण

PM Narendra Modi Goa visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गोव्यात; श्रीरामांच्या मूर्तीचं करणार अनावरण, लोटणार भक्तांचा 'पूर'; भव्य कार्यक्रमांचे आयोजन

SCROLL FOR NEXT