Goa Live Updates: लैंगिक अत्याचाराची 27 प्रकरणे तर 21 खून; दक्षिण गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

Goa Breaking News 05 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसे इतर शहरातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates | Goa Breaking News
Goa Live Updates | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

लैंगिक अत्याचाराची 27 प्रकरणे तर 21 खून; दक्षिण गोव्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

गोवा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे देशभरातील महत्वाचे राज्य आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीचा फटका काही प्रमाणात राज्याच्या पर्यटन व्यवसायाला बसला. मात्र कोविडनंतर पर्यटन व्यवसाय सुधारत असून वाढत्या परतनासोबतच इथल्या गुन्हेगारी घटनांमध्ये देखील वाढ होत आहे.

दक्षिण गोव्यात गेल्या 10 महिन्यांत 27 लैंगिक अत्याचाराची प्रकरणे उघड झाली असून 21 खून, 6 खुनाचा प्रयत्न करण्याचे प्रकार घडल्याच्या नोंदी पोलीस दफ्तरी झाल्या आहेत.

फेरीबोट शुल्कावरून कॉंग्रेस आक्रमक! कुंभारजुवेत आंदोलनाचा इशारा

 फेरीबोटवरील शुल्कावरून सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. याबाबत सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात असून शुल्क हटवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यातच कुंभारजुवे कॉंग्रेस गट समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला.

आयपीबीने मंजूर केलेले सर्व प्रकल्प म्हणजे भाजपचा घोटाळा! युरी आलेमावांचा सरकारवर निशाणा

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ (आयपीबी) 180 कोटींच्या 7 प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. हा गोव्यातील जमीन भांडवलदारांना देण्यासाठी भाजप सरकारने सुरू केलेला घोटाळा आहे. आयपीबी प्रकल्प भाजपसाठी एटीएम मशीन बनले आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आजपर्यंत आयपीबीने मंजूर केलेल्या सर्व प्रकल्पांची सखोल माहिती व आकडेवारी जाहीर करण्याचे धाडस दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले.

तेलंगणात विधानसभा निवडणुकीसाठी संकल्प आमोणकर सज्ज

तेलंगणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 105 वारंगळ पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमती राव पद्मा यांच्या प्रचारासाठी भाजपचे आमदार संकल्प आमोणकरांची नागरिकांना साद. विजयाचा विश्वास असल्याचे आमोणकरांचे मत. बैठकांमधून मतदानाचे आवाहन.

कोलवाळमध्ये रस्त्याशेजारी बेशुद्धावस्थेत सापडली 30 वर्षीय महिला; अनैतिक व्यवसायात गुंतल्याचे पोलीस तपासात उघड

कोलवाळ येथील गृहनिर्माण वसाहतीमध्ये रस्त्याच्या बाजूला 30 वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत सापडलेली. ही घटना काल म्हणजेच शनिवारी दि. 4 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास उघड झाली. सदर महिलेचा अनैतिक धंद्यात समावेश असल्याचे बोलले जातेय. पोलिसांनी सदर महिलेची रवानगी सुधारगृहात केली आहे.

तिलारीच्या दुरुस्ती कामाला पुन्हा सुरुवात! मंत्री सुभाष शिरोडकरांनी दिली महत्वाची माहिती

तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी देण्यात आली होती. मात्र सध्या गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमुळे हे दुरुस्तीचे काम काही आठवडे पुढे ढकलण्यात आले. मात्र आता ते काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

माडाच्या फेणीबाबत सरकारने जबाबदारी घ्यावी; गोवा रैंदेर संघटनेने केलीय 'ही' मागणी

गोवा म्हटलं कि काजू फेणी प्रामुख्याने ओळखली जाते. पर्यटनाच्या यादृष्टीने देखील काजू फेणीची मोठ्या प्रमाणवर विक्री होते. सरकारने गोव्याच्या या काजू फेणीला GI मानांकन मिळवून दिले आहे. त्याच प्रमाणे आता माडापासून बनवल्या जाणाऱ्या फेणीचे जीआर टॅगिंग करावे, अशी मागणी अखिल गोवा रैंदेर संघटनेने केली आहे.

काय आहेत गोव्यातील इंधनाचे दर? वाचा आजच्या किमती

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com