प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक
प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक Dainik Gomantak
गोवा

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात काँग्रेस तक्रार नोंदणार

दैनिक गोमन्तक

पणजी: दोन दिवसापूर्वी साखळीत काँग्रेसने सदबुद्धी मोर्चा काढला होता. मात्र भारतीय जनता पक्षाच्या दोन ते अडीच हजार कार्यकर्त्याने तो अडवला होता. त्याबद्दल भाजपने 144 कलमाचा भंग केल्याबद्दल काँग्रेस पोलीस महासंचालक यांना भाजप कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करावा अशी मागणी करणार आहे. अशी माहिती प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महिला बाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी साखळीत गेले होते. (Congress against Goa Chief Minister's wife and BJP workers Will lodge a complaint with the police)

यावेळी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा मोर्चा अडवला. मात्र पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पकडून नेले. त्यावेळी झटापटीत काँग्रेसच्या महिला कार्यकरत्याना दुखापत झाली आहे. त्यासाठी पोलिसांना महिला कार्यकर्त्यांना हाताळण्यासाठी योग्य प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे बिना नाईक यांनी सांगितले. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्राध्यापिका सुलक्षणा सावंत यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याही विरोधात पोलिसात तक्रार नोंद करण्यात येणार आहे. त्यानंतर पोलिसांनी पंधरा दिवसात योग्य कारवाई केली नाही तर काँग्रेस न्यायालयात जाणार असल्याचे अॅडवोकेट कार्लोस फेरेरा यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काल रात्री भूमिपुत्र विधेयकातील भूमिपुत्र शब्द वगळून भुमी अधिकाऱ्यांनी असे करणार असल्याचे सांगितले आहे तर यावर विरोधी पक्षाकडून टिका ही केली जात आहे. फेरेरा यांनी तर मुख्यमंत्र्यांचा हा निर्णय म्हणजे 'जुन्या बाटलीतील नवी दारू' अशी खोचक टिका केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT