Accident Death In Goa
Accident Death In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: मृत्यू अपघाती की घातपात!

दैनिक गोमन्तक

Goa Accident Death: काजरवाडा - बेतोडा येथे महामार्गावर धोकादायक खड्ड्यात पडून मृत्यू झालेल्या रोहिदास ऊर्फ रवी गावडे याच्या मृत्यूप्रकरणी अजूनही संभ्रम व्यक्त करण्यात येत असून हा घातपात की अपघाती मृत्यू याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

फोंडा पोलिसांनी हे प्रकरण अपघाती मृत्यू म्हणून नोंद केल्याने आज (सोमवारी) बेतोड्याचे सरपंच मधू खांडेपारकर तसेच मयताचे नातेवाईक व ग्रामस्थांनी पोलिसांची भेट घेऊन सखोल चौकशी करून सत्य काय ते समोर आणण्याची मागणी केली.

काजरवाडा - बेतोडा येथे गेल्या गुरुवारी रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात रोहिदास गावडे याचा मृतदेह कागदी पुठ्ठे व माती टाकलेल्या अवस्थेत आढळला होता. मयत रोज या मार्गाने यायचा जायचा, मात्र बुधवारी तो घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात आला.

एका सीसीटीव्ही कॅमेरात रोहिदास चालत येत असल्याचे दिसल्यानंतर रस्त्याच्या कडेने त्याचा शोध घेतला असता, दारुची बाटली व चप्पल सापडल्यानंतर खड्ड्यात पाहिले असता त्याचा मृतदेह आढळला होता. शवचिकित्सा अहवालात मयताच्या अंगावर जखमा असल्याने नेमके हे प्रकरण याबाबत सगळेच बुचकळ्यात पडले आहेत.

फोंडा पोलिसांनी एखाद्या अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने तो खड्ड्यात पडला असावा असा कयास व्यक्त करून तशी नोंद केली आहे. मात्र ग्रामस्थांनी याबाबत पोलिस निरीक्षकाची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असता, जसजशी चौकशी होईल, तसतशी कलमे बदलली जातील, असे सांगण्यात आले. पोलिस सध्या ठोकर दिलेल्या अज्ञात वाहनाच्या व चालकाच्या शोधात आहेत.

खड्ड्यांना तात्पुरत्या प्लास्टिक पट्ट्या

नॅचरल गॅस एजन्सीतर्फे हे खड्डे मारण्यात आले असून त्यांच्याच निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा दावा बेतोडावासीयांकडून करण्यात येत आहे. खड्डे मारल्यानंतर ते लगेच बुजवायला हवेत किंवा त्यांना संरक्षक कठडे तरी उभारायला हवेत, असेही ग्रामस्थ म्हणतात. सद्यस्थितीत अशा खड्ड्यांना तात्पुरते प्लास्टिक पट्ट्यांचे कठडे उभारण्यात आले आहेत. मात्र, काम वेळेत पूर्ण करून खड्डे बुजवणे तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ग्रामस्थ म्हणाले.

माझ्या भावाचा मृत्य हा घातपातच असून त्याला मारून टाकले आहे. अपघात झाल्यानंतर खड्ड्यात पडल्यानंतर वर माती आणि कागदी पुठ्ठे कुणी झाकले त्याचा शोध घ्यायला हवा. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा.
- अंकुश गावडे, काजरवाडा - बेतोडा
बेतोडा मुख्य रस्त्यावरील ट्रक हटवल्याने खूप चांगले काम पोलिसांनी केले आहे. या ठिकाणी संबंधित खात्यातर्फे सीसीटीव्ही लावणे आवश्‍यक आहे. रोहिदास गावडे याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत असल्याने पोलिसांनी सखोल चौकशी करावी ही मागणी.
- मधू खांडेपारकर, सरपंच, बेतोडा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT