Porvorim Accident Dainik Gomantak
गोवा

Porvorim Accident: पर्वरीत किरकोळ अपघातानंतर पर्यटकांचा गोंधळ, स्थानिकांसमवेत 'दादागिरी'चा प्रकार

कारच्या बॉनेटवर बसून स्थानिकांसमवेत 'दादागिरी' करण्याचा प्रकार घडलाय.

गोमन्तक डिजिटल टीम

Porvorim Accident सध्या गोव्यात पर्यटन हंगाम सुरु असून विविध राज्यातील पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. वाढते ट्रॅफिक आणि बेशिस्तपणे वाहन चालवणे अशा प्रकारांमुळे गोव्यात अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आह.

असेच एक प्रकरण नुकतेच समोर आलेआहे. पुण्याहून गोव्यात पारायणासाठी आलेल्या तरुणांच्या एका ग्रुपने पर्वरी येथे झालेल्या किरकोळ अपघातानंतर स्थानिकांसमवेत 'दादागिरी' करण्याचा प्रकार घडलाय.

मिळालेल्या माहितीनुसार पर्वरीतील चोगम रस्त्यावर पुण्याहून आलेल्या पर्यटकांच्या गाडीची धडक एका स्थानिक कारला बसली.

संबंधित कार चालकाने या घटनेचा जाब पर्यटकांना विचारला असता त्यांनी सदर कारच्या बॉनेटवर बसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर स्थानिकांनी त्या पर्यटकांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर पर्यटकांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संबंधित कार चालकाची माफी मागितली दरम्यान पर्वरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT