SGPDA Wholesale Fish Market SOPO Issue
सासष्टी: सध्या मडगावमधील एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांकडून एसजीपीडीए व नगरपालिकेचेही कंत्राटदार सोपो गोळा करतात. त्यामुळे या दोन्ही कंत्राटदारांमध्ये द्वंद्व सुरू झाले आहे. याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. आता याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी ‘एसजीपीडीए’चे सदस्य सचिव व मडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याव्यतिरिक्त कंत्राटदार व संबंधितांची सोमवारी बैठक बोलावण्यात आली आहे.
यासंदर्भात कंत्राटदार मिलाग्रेस फर्नांडिस यांनी सांगितले की, आपण सोपो गोळा करण्यासाठी १.३० कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले आहे. शिवाय आपण ‘एसजीपीडीए’च्या कुंपणामध्ये बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांकडून कधीही सोपो गोळा केलेला नाही. कुंपणाबाहेर बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांकडून सोपो गोळा करण्याचे अधिकार आम्हाला नगरपालिकेने दिले आहेत. मात्र, ‘एसजीपीडीए’चा कंत्राटदार कुंपणाबाहेर बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांकडूनही प्रत्येकी २०० रुपये सोपो गोळा करतात व त्यांना पावती देत नाहीत.
नगरपालिकेचे सोपो कंत्राटदार मिलाग्रीस फर्नांडिस यांनी सांगितले की, उच्च न्यायालयाने ‘एसजीपीडीए’ला सोपो गोळा करण्यासंदर्भात निविदा जाहीर करण्याचा आदेश दिला असताना तो अजूनपर्यंत पाळला जात नाही. यात मुख्यमंत्री तसेच ‘एसजीपीडीए’च्या अध्यक्षांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. सोमवारच्या बैठकीत आपण आपली बाजू मांडणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.