National Education policy 2020 Dainik Gomantak
गोवा

Education Policy 2020: राष्ट्रीय शिक्षण धोरणावर उद्यापासून परिषद

कोरोनानंतर बदललेल्या आव्हानांवर होणार चर्चा

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्र सरकारने देशभर लागू केलेल्या ''राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020'' वर गोवा मुख्याध्यापक असोसिएशन आणि गोवा समग्र शिक्षा अभियानच्यावतीने 4 आणि 5 ऑगस्ट अशा दोन दिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे समन्वयक विलास सतरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष माधव खारवी, म्हाळसाकांत देशपांडे, मारियानो वॉलरीस आणि मान्यवर उपस्थित होते.

(Conference on “National Education Policy 2022” in Goa from 4th August)

जुने गोवेच्या सेंट जोसेफ वाझ स्पिरीच्युअल रिन्यूअल सेंटर येथे होणाऱ्या या परिषदेचे उदघाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल. परिषदेमध्ये डॉ. काश्यपी अवस्थी, विलास सतरकर, शिक्षण संचालक शैलेश झिंगडे उपस्थित राहतील.

केंद्र सरकारने जुलै 2020 मध्ये लागू केलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि तेव्हापासूनच देशभर थैमान घालणारा कोरोना, यामुळे निर्माण झालेली क्वारंटाईन स्थिती, बंद राहिलेल्या शाळा, त्याचा मुलांवर झालेला परिणाम या विषयावर सविस्तर चर्चा होणार आहे. आज मुलांबरोबर शिक्षकांसमोरही शिकवण्यासंदर्भात मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. यासाठी ही परिषद फलदायी ठरेल, असे सतरकर म्हणाले.

शिक्षण संस्‍थांनी अंगणवाड्या, बालवाड्या दत्तक घ्याव्यात

पणजी: बालवाडी आणि अंगणवाडी हा शिक्षणाचा पाया आहे. हा पाया अधिक मजबूत व्‍हावा यासाठी मोठ्या शिक्षण संस्‍थांनी पुढे यावे, आणि आपल्‍या परिसरातील अंगणवाड्या किंवा बालवाड्या दत्तक घ्याव्‍यात, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी परिपत्रकाद्वारे केले आहे.

राज्‍यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी किमान एक अंगणवाडी दत्तक घ्यावी. या बालवाडीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्‍न करावेत, असे या परिपत्रकात म्‍हटले आहे. संस्था प्रमुखांनी संबंधित व्यवस्थापनांशी सल्लामसलत करून परिसरातील बालवड्यांची माहिती घेऊन दत्तक घेण्यासंबंधी शुक्रवार 5 ऑगस्टपर्यंत खात्‍याकडे माहिती सादर करावी, असे आवाहन या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT