Comunidade Land Goa Dainik Gomantak
गोवा

Comunidade Land Goa: कोमुनिदादींच्या जमिनी केवळ गावकार व भागधारकांच्याच; हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला अधिकार नाही

Comunidade Land Goa: आसगाव कोमुनिदादचे अध्यक्ष रूइल्डो डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली आजची (१६ जुलै) बैठक झाली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: कोमुनिदादींच्या जमिनींवर केवळ गावकार व भागधारकांचाच अधिकार आहे. त्यात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला कोणताच अधिकार नाही, असे उत्तर गोव्यातील कोमुनिदादींच्या प्रमुखांनी ठणकावून सांगितले.

'कोमुनिदादीचे रक्षण करा व गोवा वाचवा' या बॅनरखाली बुधवारी (ता.१६) आसगाव कोमुनिदाद कार्यालयात जागृती बैठक पार पडली. यावेळी उत्तरेतील कोमुनिदादींचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारने कोमुनिदाद जमिनींवरील बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न केल्यास, त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला.

सरकारने जो निर्णय घेतलाय, त्याचा आम्ही प्रखर विरोध करतो. सर्व समित्या एका ठराविक संघटनेच्या बॅनरखाली येऊन पुढील दिशा ठरवतील.
रुइल्डो डिसोझा

असे पाऊल उचलल्यास बेकायदा बांधकामे फोफावतील अन् नीज गोंयकार जे कायदेशीर मार्गाने बांधकामे उभारतात, त्यांच्यावर हा अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे आमचा सरकारच्या निर्णयाला तीव्र आक्षेप आहे, असे स्पष्ट करण्यात आले. आसगाव कोमुनिदादचे अध्यक्ष रूइल्डो डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली आजची (१६ जुलै) बैठक झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election: 'मगो'च्या सर्वेक्षणावर भाजपचे मौन! फोंड्यानंतर साखळीसह 12 मतदारसंघांवर दावा

iPhone 18 Pro कधी होणार लॉन्च? Appleने दिली अधिकृत तारीख; कंपनीकडून पहिला Foldable फोन पाहायला मिळणार? उत्सुकता वाढली

खरी कुजबुज: राजकीय पक्षांतील चढाओढ

Goa Police Torture: 5 तरुणांना बेकायदा कोठडी, अमानुष मारहाण अन्.. 'मानवाधिकार'ची खाकीला चपराक; पीडितांना प्रत्येकी 20 हजारांची भरपाई देण्याची शिफारस

Zodiac Personality Traits: जिद्दीच्या बाबतीत नंबर-1! स्वतःचे मत सहजासहजी न बदलणाऱ्या 3 बलवान राशी; वादविवाद अजिबात करु नका

SCROLL FOR NEXT