Compound Wall Collapsed in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Compound Wall Collapsed: मुसळधार पावसामुळे म्हापशात कोसळली कंपाऊंडची भिंत; 5 लाखांचे नुकसान

सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमन्तक

Compound Wall Collapsed in Mapusa: दोन दिवसांपासून राज्यात पावसाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी पडझड झाल्याच्या घटनाही सुरू झाल्या आहेत. काल दिवसभरात अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी 20 घटना हाताळल्याची माहिती दिली आहे. यामध्ये म्हापसामध्येही पावसाचा फटका बसला असून एका घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळली आहे.

माहितीनुसार, म्हापशातील एकता नगर येथे झालेल्या मुसळधार पावसाने एका घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळली. यामुळे भिंतीला लागून उभ्या असलेल्या दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एकूण 5 लाखांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, दोन दिवसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर आणि वाहनांवर झाडे कोसळल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. फोंड्यात पावसाने दाणादाण उडवल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील सखल भागात पाणी साचले आहे. नाले दुथडी भरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले.

फर्मागुडी येथे पार्किंगमधील एका कारवर गुलमोहराचे झाड कोसळले. यात गाडीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या वेळी गाडीत किंवा या परिसरात कुणी नव्हते त्यामुळे जीवीतहानी झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT