Bicholim ESI Hospital Dainik Gomantak
गोवा

ESI Hospital: ''ईएसआय'' हॉस्पिटल प्रकल्पाला शिघ्रगतीने चालना द्या; डॉ. शेट्ये यांची मागणी

Bicholim News: केंद्र सरकारच्या सहकार्याने मुळगाव येथे १५० खाटांचे ''ईएसआय'' हॉस्पिटल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली मतदारसंघातील मुळगाव येथील नियोजित आणि महत्वाकांक्षी ''ईएसआय'' हॉस्पिटल प्रकल्पाला शिघ्रगतीने चालना द्या, अशी मागणी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केली आहे.

आमदार डॉ. शेट्ये यांनी आज (मंगळवारी) राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांची भेट घेवून ''ईएसआय'' हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. खासदार श्री. शेट तानावडे यांनी आमदारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी ''ईएसआय''चे अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या सहकार्याने मुळगाव येथे १५० खाटांचे ''ईएसआय'' हॉस्पिटल प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. दोडामार्ग रस्त्यावरील मुळगाव येथील जागेत हा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. उत्तर गोव्यातील कामगारवर्गाला या इस्पितळामुळे उपचारासाठी चांगली सोय होईल. डिचोली, साखळी, वाळपईत परिसरातील कर्मचाऱ्यांनाही हे जवळेचे इस्पितळ ठरेल, असे कामगारवर्गाचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT