Anjuna Gramsabha Viral Video Dainik Gomantak
गोवा

Music Events Controversy: हणजूण मारहाण प्रकरण चिघळले; दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल!

Dispute between groups over Goa Music Events festivals: गोव्यात संगीत महोत्सवांवरून वाद सुरू असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे

Akshata Chhatre

हणजूण: गोव्यातील संगीत महोत्सवांवरून सुरू असलेला वाद रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) रोजी प्रचंड चिघळला होता. हणजूण येथे संगीत महोत्सवासंदर्भात आयोजित ग्रामसभेत धक्काबुक्कीची घटना घडली आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र आता दोन्ही गटांकडून हणजूण पोलीस स्थानकात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हणजूणच्या भागातून संगीत महोत्सव कायमचे बंद व्हावेत म्हणून मत मांडणाऱ्या डॉ. इनासिओ फर्नांडिस यांनी ग्रामसभेच्या बैठकीत गजानन तिळवे यांच्यासह अनेक जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीत त्यांनी विरोधी समूहानं मारहाण केल्याचे तसेच शिवीगाळ केल्याचे आरोप केले आहेत. सदर प्रकरणात विरोधी पक्षातील गजानन तिळवे यांनी देखील डॉ. इनासिओ फर्नांडिस यांच्यानावे गैरवर्तनाचा आरोप करत उलट तक्रार दाखल केली. या तक्रारीत त्यांनी डॉ. फर्नांडिस यांनी धमकी दिल्यास तसेच मारहाण केल्यास आरोप केले आहेत.

रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . वादामुळे ग्रामसभा स्थगित करावी लागली असून १५ डिसेंबरला पुढील ग्रामसभा होईल, अशी माहिती सरपंच लक्ष्मीदास चिमूलकर यांनी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

Goa Cabinet: दोन दिवसांत गोवा मंत्रीमंडळात फेरबदल? मुख्यमंत्री सावंतांची दिल्लीत खलबंत, मंत्री-नेत्यांशी भेटीगाठी

Cryptocurrency: ''...तर आज तुम्ही 2450 कोटींचे मालक असता'', बिटकॉइनने गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Goa Live News: मांद्रेचे माजी सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडून 350 पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत!

SCROLL FOR NEXT