Goa Medical College Hospital  Dainik Gomantak
गोवा

GMC Hospital: गोमेकॉत होतेय औषधे देण्यात मोठी कुचराई; रुग्णांना औषधांसाठी फेऱ्या मारण्याची वेळ

Goa GMC: डॉक्टरनी औषधांची शिफारस केल्यावर तो कागद औषधालयात ठेवला जातो

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टर्सने शिफारस केलेली औषधे पुरेशा प्रमाणात न देण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे रुग्णांना औषधांसाठी बांबोळीत फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे.

सुपर स्पेशालिटी इमारतीत असलेल्या इस्पितळाच्या औषधालयाकडून हा अनुभव रुग्णांना येऊ लागला आहे. एकावेळी डॉक्टरनी औषधांची शिफारस केल्यावर तो कागद औषधालयात ठेवला जातो व औषधे रुग्णाला दिली जातात. काही रुग्णांना डॉक्टर्स तीन महिन्यांची औषधे लिहून देतात. त्यात ९० गोळ्या लिहिल्या गेल्या असतानाही ५० गोळ्या दिल्या गेल्या आहेत.

तीन प्रकारच्या गोळ्या या प्रत्येकी ९० याप्रमाणे रुग्णाला मिळणे आवश्यक असताना दोन प्रकारच्या गोळ्या प्रत्येकी ५० दिल्याने रुग्णाला ८० गोळ्या प्रत्यक्षात कमी मिळाल्या. दुसऱ्या प्रकारच्या १८० गोळ्या देण्याऐवजी १६० गोळ्याच देण्यात आल्या, त्यामुळे तेथेही २० गोळ्या कमी दिल्या गेल्या. रुग्णाला ९० ऐवजी ८४ अशा दोन प्रकारच्या गोळ्या दिल्याने त्याला १२ गोळ्या कमी मिळाल्या आहेत. असे प्रकार अलीकडे वाढत चालल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

डॉक्टरांनी लिहून दिलेल्या काही गोळ्याही दिल्या गेल्या नाहीत. त्या गोळ्या नाहीत, असेही औषधालयाकडून सांगण्यात आले नाही. अन्यथा डॉक्टरकडे जाऊन रुग्‍णाला त्या गोळ्या उपलब्ध नसल्याने बदलून घेता आल्या असत्या. रुग्णांना डॉक्टर लिहून देत असलेले प्रिस्क्रीप्शन औषधालयात जमा करण्यात येत असल्याने रुग्णाला आपल्याला कमी औषधे मिळाली हे समजत नाही.

दरम्यान, गोमेकॉत राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. औषधालयातील कर्मचाऱ्यांच्या अशा बेपर्वा वृत्तीमुळे त्यांना मात्र गोमेकॉत येण्याचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

एका रुग्णाने मात्र डॉक्टरने लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शनचे छायाचित्र मोबाईलवर टिपून ठेवले. त्याने लिहून दिलेली गोळ्यांची संख्या आणि औषधालयातून दिलेल्या गोळ्यांची संख्या ताडून पाहिली असता गोळ्या कमी दिल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याशिवाय धक्कादायक म्हणजे दोन प्रकारच्या गोळ्या दिल्याच गेल्या नव्हत्या आणि त्या गोळ्या नाहीत याची कल्पनाही रुग्णाला दिली गेली नव्हती.

त्या रुग्णाने गोळ्या कमी दिल्या हे लक्षात आणून देण्यासाठी दुसऱ्या दिवशी सुपर स्पेशालिटीमधील औषधालय गाठले असता त्या रुग्णाला उर्वरित गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरकडून पुन्हा प्रिस्क्रीप्शन लिहून आणा, असे सांगण्यात आले. दोन प्रकारच्या गोळ्या दिल्या नसल्याचे त्याने लक्षात आणून दिल्यावर एका प्रकारच्या गोळ्या बाहेरून घ्याव्या लागतील, असे उत्तर देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

KL Rahul Century: लॉर्ड्सच्या मैदानावर राहुलची बादशाही, आशियात कुणालाच जमलं नाही ते करुन दाखवलं

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT