Pernem  Dainik Gomantak
गोवा

Pernem News : अन्य देशांच्या तुलनेत भारतीय अधिक कुटुंबवत्सल : प. पू. शाहू महाराज

Pernem News : शिरगळ धारगळ येथे मान्यवरांचा सत्कार

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem News :

पेडणे,"प्रत्येकाला आपले स्वतःचे हक्काचे घर असावे त्यात मुलांचे शिक्षण व्हावे, त्यातून कुटुंबाचा पाया मजबूत व्हावा असे वाटते. मी इंग्लंड ,जपान अमेरीका सारख्या मोठ्या प्रगत देशात राहून आलो व त्यांचे राहणीमान जवळून पाहिले.

पण भारतीय हे कुटुंब वत्सल आहेत, आपल्या माणसांच्या घरी येण्याची ते वाट पाहतात. त्यात प्रेम ,जिव्हाळा असतो. अशी वाट पहाण्यात मोठा आनंद असतो, असे प्रतिपादन प. पु. शाहू महाराज यांनी केले.

शिरगळ धारगळ येथे ते बोलत होते.माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, हभप विष्णुबुवा शेटगावकर ,उद्योजक योगेश शेटगावकर ,गोपाळदास आर्लेकर, मांद्रे मठातील श्रीपाद वल्लभ महाराज ,सिध्दराज सिध्दारुढ म्हामल व सोहम सिध्दारुढ म्हामल यांचा शाहू महाराज यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उल्हास वंसकर हे होते.

शाहू महाराज पुढे म्हणाले की,कष्ट मेहनत घेणारे मातीतून मोती पिकवतात. गुजराती ,राजस्थानी दुकानदार ,व्यावसायिक आपली दुकाने व्यवसाय दुपारी बंद ठेवत नाहीत.तर गोमंतकीय सुशेगाद राहून वेळेला महत्व देत नाहीत.

गोव्यात बहुतांश सगळीकडे दुपारी एक वाजता बंद झालेली गोमंतकीयांची दुकाने संध्या. ४ नंतर उघडतात. भाषा हे संपर्काचे साधन आहे.जास्तीत जास्त भाषा शिकाव्यात, असे सांगून ते काही वाक्ये अस्सल कोंकणीतून बोलले. सूत्रसंचालन प्राची नाईक यांनी केले.

सदगुणांचा आदर केला जातो. त्यानुसार समाजासाठी जे झटतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा सत्कार समारंभांची गरज असते व इतरांना त्यातून प्रेरणा मिळाली पाहिजे. पेडणे तालुका व राज्याप्रती माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा माझा प्रयत्न राहील. -लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT