Goa Dengue Cases Dainik Gomantak
गोवा

Goa Dengue Cases: 2022 च्या तुलनेत यंदा राज्यातील डेंग्यू रुग्णांच्या संख्येत घट; 'हे' आहे कारण

दैनिक गोमन्तक

Goa Dengue Cases: गोव्यात 2022 च्या पहिल्या पाच महिन्यांत डेंग्यूचे 64 रुग्ण आढळले होते, तर यावर्षी गोव्यात केवळ 48 प्रकरणे आढळून आली आहेत. आरोग्य अधिकार्‍यांनी 2023 मध्ये ही प्रकरणे कमी येण्यामागे अवकाळी पावसाला याचे श्रेय दिले आहे. गेल्या वर्षी, मान्सून अधिकृतपणे दाखल होण्यापूर्वीच, गोव्यात तीन ठिकाणी डेंग्यूचा प्रसार झाला होता.

गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या अवकाळी पावसात वाळपई आणि कळंगुट येथील भागातून डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळले. गेल्या वर्षी सततच्या पावसामुळे कळंगुटमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून आले होते, असे गोवा येथील राष्ट्रीय वेक्टर-बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना महात्मे यांनी सांगितले.

डेंग्यूच्या डासांची पैदास स्वच्छ पाण्यात होत असल्याने, कोणतेही रिकामे कप, वापरात नसलेले टायर किंवा डासांसाठी संभाव्य प्रजनन स्थळ ठरू शकणारे इतर साहित्य उघड्यावर टाकून देऊ नये, असे आरोग्य सेवा संचालनालयातर्फे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात मडगाव येथेही चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते.

वाढलेल्या उन्हाळ्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन दयनीय झाले आणि शेतकरी समुदायाच्या योजना विस्कळीत झाल्या मात्र रोग नियंत्रण कार्यक्रम चालवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना याचा फायदा झाला.

याबाबत महात्मे म्हणाल्या की, यावर्षी आमचे उपक्रम पार पाडण्यासाठी आम्हाला थोडा अतिरिक्त वेळ मिळाला. यामुळे जिथून दासांची उत्पत्ती होते असे स्त्रोत नष्ट करण्यासाठी या कालावधीचा वापर झाला. मलेरिया नियंत्रणात असल्याने संचालनालयाने डेंग्यू नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

SCROLL FOR NEXT