Land issue in Goa Dainik Gomantak
गोवा

Land issue in Goa: आयुक्तांकडून 'त्या' वादग्रस्त जमीन प्लॉटची पाहणी

राज्यातील जमीन हडप प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Land Grabbing Case: उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांची गोव्यातील बेकायदेशीरपणे जमीन बळकावण्याच्या घटनांच्या चौकशीसाठी एक सदस्यीय आयोगाचे आयुक्त म्हणून राज्य सरकारकडून नियुक्ती केली आहे.

त्यांनी गुरुवारी आसगाव-बादे, हणजूण तसेच कळंगुटमध्ये भेट देत एकूण नऊ प्लॉटची पाहणी केली. यावेळी एसआयटीचे पदाधिकारी आयुक्तांसोबत होते.

बार्देश तालुक्यात जवळपास 51 जागे कथितरित्या बळकावल्याचा आरोप आहे. तर एसआयटीने आतापर्यंत 44 गुन्हे नोंदविले आहेत. तर 26 जणांना आतापर्यंत अटक झाली आहे. राज्यातील एकंदरीत या जमीन हडप प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

त्यानंतर सरकारने निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांची या जमीन बळकावण्याच्या घटनांच्या चौकशीसाठी एकमेव सदस्य आयुक्त म्हणून नियुक्ती केली. त्यांनी गुरुवारी विविध जागांची तसेच प्लॉटची पाहणी केली.

यावेळी पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, उपअधीक्षक संतोष देसाई, एसआयटी पोलीस निरीक्षक सुरज सामंत तसेच एसआयटीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त जाधव यांनी सुरवातीला बादे-आसगाव येथे चार जागांना भेट देत पाहणी केली. आणि दुपारनंतर हणजूण व कळंगुट परिसरास भेट दिली.

सुहैलला सातव्यांदा अटक

जमीन हडपप्रकरणी एसआयटीमार्फत सुरू असलेल्या प्रकरणातील मास्टरमाईंड महम्मद सुहैल याला आणखी एका कळंगुट येथील प्रकरणात सातव्यांदा अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

तो अनेक प्रकरणांमध्ये असल्याने एका प्रकरणातून जामीन मिळाल्यावर त्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये अटक करण्याचे सत्र सुरूच आहे.

काल त्याला सहाव्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर लगेच त्याला सातव्या प्रकरणात एसआयटी पथकाने अटक केली होती. त्याच्याविरुद्ध आतापर्यंत एसआयटीने केलेल्या चौकशीत सुमारे 20 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये त्याचा समावेश आहे.

आज काय घडले?

  • निवृत्त न्यायाधीस व्ही. के. जाधव यांनी एकूण 9 मालमत्तांची पाहणी केली. आसगाव-बादे 4, कळंगुट 2, हणजूण 3. यावेळी आयुक्तांसोबत जमीन बळकावणाच्या प्रकरणांची तपास करणारी एसआयटी यंत्रणा हजर होती.

  • आयुक्तांनी एसआयटीच्या अधिकाऱ्यांना सर्व एफआयआरच्या प्रती सादर करण्यास सांगितले. याशिवाय संशयित आरोपींना जमीन हडप प्रकरणात वापरलेली तपशीलवर मोडस ऑपरेंडी, म्युटेशन, करारपत्र व इतर दस्ताऐवज सादर करण्यास सांगितले. पाहणी केलेल्या बहुतांश मालमत्ता या सूत्रधार मोहम्मद सुहेलच्या आहेत.

  • येत्या सोमवारपासून आयुक्त हे या खटल्यांची दुसरी सुनावणी सुरू करतील. दरम्यान, म्हापसा जीएमएफसी कोर्टाने जमीन हडपल्याच्या मास्टरमाइंड असलेल्या संशयित मोहम्मद सुहैलला जामीन मंजूर केला. त्याला एसआयटीने आतापर्यंत सहावेळा अटक केली होती.

  • या नऊ जागांपैकी काही प्लॉट हे ओळखीचे तर काही अनोखळी आहेत. यातील चार प्लॉटवर बांधकाम अर्धवट स्थितीत आहेत, तर काही जागा पडीक. तर एक ठिकाणी पूर्ण पोर्तुगीज घरच बनावट कागदोपत्रांच्या सहाय्याने हडप केले.

  • जमीन हडप प्रकरणातील उपनिरीक्षक योगेश गडकर हे एसआयटी तपास टीममध्ये सक्रीय असल्याचे दिसून आले. पाहणीवेळी आयुक्तांच्या प्रश्‍नांना ते कुठलेही कागदपत्र किंवा छापील नोंदची मदत न घेता उत्तर देत होते. याबद्दल आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT