Archbishop Filipe Neri Cardinal Ferrao Dainik Gomantak
गोवा

'वादग्रस्त वक्तव्य करु नका, प्रत्येक धर्मांचा आदर करा', आर्चबिशप फेर्राव यांची धर्मगुरूंना सक्त ताकीद

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा दिला.

Pramod Yadav

Archbishop Filipe Neri Cardinal Ferrao: ताळगाव येथील एका ख्रिस्ती धर्मगुरूने चर्चमध्ये संबोधित करताना हिंदू धर्मियांच्या देवांबद्दल आक्षेपार्ह उद्घगार काढले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा दिला. याप्रकरणी आता आर्चबिशप फेर्राव यांनी देखील धर्मगुरूंना सक्त ताकीद दिली आहे.

आर्चबिशप फिलिप नेरी कार्डिनल फेर्राव यांनी चर्चच्या सदस्यांनी हिंदू देवाबद्दल केलेल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला. अशी वक्तव्य टाळण्याची सक्त ताकीद त्यांनी धर्मगुरुंना दिली. एकमेकांच्या धर्मांचा आदर करण्याचे आणि सौहार्द राखण्याचे आवाहनही आर्चबिशप फेर्राव यांनी केले आहे.

दरम्यान, राज्यात यापुढे कोणीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला, तर सरकार कडक कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा दिला आहे. मुख्यमंत्री केवळ इशारा देऊनच थांबले, तर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्याला तत्काळ अटक केली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.

तसेच, ख्रिस्ती धर्मगुरूच्या वक्तव्याचा हिंदू रक्षा महाआघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जातीय विद्वेष निर्माण करणाऱ्या धर्मगुरूविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाआघाडीने केली आहे.

पाद्रींकडून चर्चचे धार्मिक व्यासपीठ हिंदूविरोधी प्रचार करण्यासाठी वापरल्याबद्दल आर्चबिशपनी गोव्यातील हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी. अशी भूमिका हिंदू रक्षा महाआघाडीने घेतली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT