Reconstruction Work Of The Bridge Dainik Gomantak
गोवा

भुईपाल पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ

प्रदीर्घ काळाची मागणी पूर्ण: आमदार डॉ. दिव्या राणे यांनी घेतला पुढाकार

गोमन्तक डिजिटल टीम

पर्ये मतदारसंघातील भुईपाल येथे होंडा ते वाळपई रस्त्यावर असलेल्या पोर्तुगीजकालीन पुलाच्या पुनर्बांधणी कामाचा शुभारंभ मंगळवारी (ता. 28) आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते करण्यात आला. या ठिकाणी असलेलापूल कमकुवत झाल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता.

यावेळी होंडा जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, स्थानिक पंच स्मिता मोटे, सिया बोडके, उपसरपंच रेशम गावकर, पंच सुशांत राणे, नीलेश सातार्डेकर, कृष्णा गावकर, सरकारी बांधकाम खात्याचे साहाय्यक अभियंता वेलिंगकर, कनिष्ठ अभियंता चंदन व सावईकर, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्त्यावर भुईपाल प्रभाग क्रमांक 9 मध्ये येणाऱ्या वन तपासणी नाक्याजवळ असलेला हा पूल फार वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलावरून दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असल्याने कमकुवत झालेल्या या पुलावर बराच ताण पडत होता.

वाळपई ते पणजी या राज्य मार्गावर येणाऱ्या या पुलाचे बांधकाम होणे गरजेचे होते. त्यामुळे पुलाच्या कामाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. पुलाच्या कामाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा या भागाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी करून या कामाला सुरुवात करण्यात आली.

याचा खर्च सुमारे 28 लाख रुपयेअसून येत्या पावसाळ्यापूर्वी काम मार्गी लागणार असल्याची माहिती रस्ता विभागाचे सहाय्यक अभियंता वेलिंगकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT