kunal kamra viral post Dainik Gomantak
गोवा

"गोव्याकडून शिका", OLAच्या ढिसाळ कारभारावर कुणाल कामरा भडकला! 'विक्री थांबवा' मागणीला समर्थन; Post Viral

Kunal Kamra OLA Post: देशातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि युट्युबर कुणाल कामरा याने गोव्यातील स्कूटर मालकांच्या बाजूने आवाज उठवला आहे

Akshata Chhatre

Kunal Kamra Supports Ban OLA: गोव्यातील ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर मालक सध्या कंपनीच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून रस्त्यावर उतरले आहेत. गोव्यातील ओलाच्या तिन्ही सर्विस स्टेशनवर सुमारे २ हजारहून अधिक स्कूटर्स दुरुस्तीच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून आहेत आणि सर्विस स्टेशनवरील कर्मचारी अत्यंत उर्मटपणे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे.

कुणाल कामराचा 'ओला'वर शाब्दिक हल्ला

या गंभीर परिस्थितीत, आता देशातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि युट्युबर कुणाल कामरा याने गोव्यातील स्कूटर मालकांच्या बाजूने आवाज उठवला आहे. कामराने 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्यावर थेट टीका केली. कामरा म्हणाला की, "हाच एकमेव उपाय आहे, जो भाविश अग्रवाल यांच्या ग्राहकांबद्दल असलेल्या गैरजबाबदारपणाला सुधारू शकतो."

'विक्री थांबवा' मागणीला राष्ट्रीय समर्थन

कुणाल कामराने गोव्यातील ओला मालकांनी सुरू केलेल्या 'ओला स्कूटर्सची विक्री थांबवा' या आंदोलनाचे स्वागत केले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, "ओला स्कूटर्सची विक्री थांबवण्याच्या या स्वागतार्ह निषेधाला... मला आशा आहे की इतर राज्येही (गोव्याचे) अनुकरण करतील." त्याच्या या वक्तव्यामुळे गोव्यातील ही स्थानिक समस्या आता राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आली आहे, ज्यामुळे ओला कंपनीवर तातडीने कार्यवाही करण्याचा दबाव वाढला आहे

मुख्यमंत्र्यांकडे हस्तक्षेपाची मागणी

गोव्यातील स्कूटर मालकांनी मोठ्या कष्टाने पैसे खर्च करून या स्कूटर्स घेतल्या आहेत, मात्र कंपनीच्या या मनमानी कारभारामुळे ते सध्या वैफल्यग्रस्त बनले आहेत. त्यांनी एकत्र येत थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. लोकांच्या हातून काहीतरी विपरीत घडण्यापूर्वी सरकारने या समस्येकडे लक्ष द्यावे आणि सर्व नादुरुस्त स्कूटर्सची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्याची सूचना ओला शोरूमला द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत गोव्यात ओला स्कूटर्सची विक्री तात्काळ थांबवावी, असे त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Salman Khan Terrorist: बॉलिवूडचा 'टायगर' पाकिस्तानसाठी 'दहशतवादी', भाईजानच्या बलुचिस्तान विधानावरून पाकड्यांना झोंबली मिर्ची

Viral Video: टीव्हीला हेल्मेट बनवणाऱ्या पठ्ठ्याचा 'देसी जुगाड', सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'याला भारतरत्न द्या'

Jogamma Jogappa History: कार्तवीर्य अर्जुनाने जमदग्नीचा वध केल्याने रेणुका विधवा झाली; जोगम्मा आणि जोगप्पाची कथा

"शाहबाज शरीफ आणि आसिफ मुनीर महान लोक...''; दहशतवाद पसरवणाऱ्यांना ट्रम्प यांच्याकडून 'ग्रेट पीपल'चा दर्जा, आसियान परिषदेत उधळली स्तुतीसुमने

Upcoming Phones: Realme, OnePlus... 'या' आठवड्यात लॉन्च होणार 'हे' जबरदस्त स्मार्टफोन; फीचर्स एकदा पाहाच…

SCROLL FOR NEXT