Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Goa Murder Case: या प्रकरणाची मडगाव न्‍यायालयात सुनावणी होती. यावेळी जगदीश दाेडामणी, मुतण्‍णा अनावलाड, सुरेश पुजार या तीन संशयितांना न्‍यायालयात हजर केले.

Sameer Panditrao

मडगाव: अनैतिक संबंधांतून आपल्‍या मित्रांच्‍या साहाय्‍याने आपल्‍याच पतीचा खून करण्‍याचा आरोप असलेल्‍या लक्ष्‍मी संगनगौडा आरान्सी या ३३ वर्षीय महिला संशयिताला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगद्वारा सुनावणीस हजर करण्‍यास कोलवाळ तुरुंगाच्‍या अधिकाऱ्यांना अपयश आल्‍याने मडगावच्‍या सत्र न्‍यायालयाने तुरुंग अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गुरुवारी या प्रकरणाची मडगाव न्‍यायालयात सुनावणी होती. यावेळी जगदीश दाेडामणी, मुतण्‍णा अनावलाड, सुरेश पुजार या तीन संशयितांना न्‍यायालयात हजर केले. मात्र, लक्ष्‍मी संगनगौडा अरान्‍सी हिला सुनावणीसाठी कोलवाळ तुरुंगाच्‍या व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग कक्षामध्‍ये आणले गेले नाही त्‍यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्‍याची वेळ न्‍यायालयासमोर आली.

लक्ष्‍मीला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंग कक्षामध्‍ये का आणले गेले नाही याची कारणे स्‍पष्‍ट करावीत, असे विचारणारी नोटीस न्‍यायालयाने आता तुरुंग अधीक्षकांना पाठविली आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी अशी...

संशयित लक्ष्‍मी हिचे सुरेश पुजार याच्‍याशी अनैतिक संबंध होते. त्‍याची कुणकुण तिचा पती संगनगौडा अरान्‍सी याला लागल्‍यावर तिने सुरेश आणि अन्‍य संशयितांच्‍या साहाय्‍याने मारण्‍याचा कट रचला.

संगनगौडा हा आजारी असायचा, त्‍यामुळे त्‍याच्‍यावर उपचार करण्‍याच्‍या बहाण्‍याने कर्नाटकातून कारने त्‍याला गोव्‍यात आणले. ही गाडी अनमाेड घाटात पोहोचल्‍यावर संशयितांनी संगनगौडाचा गळा आवळून खू्न केला.

नंतर त्‍याची ओळख पटू नये यासाठी तोंडावर ॲसिड टाकून त्‍याचा मृतदेह अनमोड येथे टाकण्‍यात आला. या प्रकरणात नंतर कुळे पोलिसांनी या सर्व संशयितांना अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Indigo Flight: AC निकामी,तरीही टेक-ऑफचा प्रयत्न, 3 तास पर्यायी विमानाची सोय नाही; मुंबई-गोवा प्रवासात इंडिगोचा निष्काळजीपणा

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; चेन्नईच्या खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा! 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Goa Panchayat Workers: सातवा वेतन आयोग लागू करा, अन्यथा पंचायत कर्मचारी संपावर; 'आयटक'चा इशारा

Goa Assembly Live: साळगाव दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर

Goa Politics: सरकार गोवेकरांचे की दिल्लीकरांचे? आमदार वीरेश यांचा सवाल, 'सडेतोड नायक'मध्ये मांडली भूमिका

SCROLL FOR NEXT