Two girls who kidnapped from Goa Dainik Gomantak
गोवा

Kidnapping Case: मोठी बातमी! गोव्यातील दोन मुलींचे अपहरण, हुबळीत ठेवले ओलीस, कोलवाळ पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन

कोलवाळ पोलिसांनी कारवाई करत मुलींची सुखरूप सुटका केली आहे.

Pramod Yadav

Two girls who kidnapped from Goa: गोव्यातील दोन मुलींचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली असून, त्यांना कर्नाटकातील हुबळी येथे ओलीस ठेवण्यात आले. कोलवाळ पोलिसांनी कारवाई करत मुलींची सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Colvale police rescues 2 girls who kidnapped from Goa and kept hostage at a house at Hubli

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्नोडा येथील हिंदू आणि मुस्लिम समाजातील दोन मुलींना हुबळी येथील एका घरात डांबून ठेवण्यात आले. पालकांनी मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची एक टीम तयार करण्यात आली आणि तपासाला सुरूवात झाली.

पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करत हुबळी येथून दोन मुलींची सुखरूप सुटका केली. पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

मुलींच्या अपहरणाच्या कारणाचा सध्या पोलिस शोध घेत आहेत. दोन्ही मुली सुखरूप असल्याची पोलिसांनी पुष्टी केली आहे. मुलींना परत आणल्यानंतर त्यांची कुटुंबीयांसोबत भावनिक भेट झाली.

पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून अपहरणाबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Literacy: अभिमानास्पद! गोवा साक्षरतेत देशात अव्वल; 99.27 टक्के नागरिक शिक्षित

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’बाबत धक्कादायक माहिती समोर! विद्यार्थ्यांना मिळायच्या सिगारेट्स; ‘कुरियर बॉय’ची तपासणी सुरु

Goa London Flight: लंडन-गोवा विमानसेवा रद्द! Air Indiaचा निर्णय; अहमदाबाद, अमृतसर सेवा होणार सुरु

Arpora: भटक्या गुरांची झुंज, दुचाकीला बसली जोरदार धडक; हणजूणच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

COD Fraud: ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ करताय? लागू शकतो चुना; मुरगावात भामट्यांची टोळी सक्रिय, 12 जणांची फसवणूक

SCROLL FOR NEXT