Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: सिरसईतील आई-लेकीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला अटक; कोलवाळ पोलिसांची कारवाई

फिर्यादी पीडित युवतीचा अज्ञात संशयिताने दुचाकीवरून पाठलाग केला व तिला पकडून तिचा विनयभंग केला.

दैनिक गोमन्तक

सिरसई येथील एका युवती व तिच्या आईचा विनयभंग करून पीडितेचा पाठलाग करणार्‍या संशयित आरोपी प्रवीण पार्सेकर (22, रा. कान्सा थिवी) यास कोलवाळ पोलिसांनी अटक केली.

हा प्रकार गेल्या दि. 3 जानेवारी रोजी घडला होता. फिर्यादी पीडित युवतीचा अज्ञात संशयिताने दुचाकीवरून पाठलाग केला व तिला पकडून तिचा विनयभंग केला. नंतर त्याच दिवशी संशयित फिर्यादींच्या घराच्या व्हरांड्यात गेला. तिथे पीडितेची आई होती तिला पाहून त्याने हस्तमैथुन केले आणि लैंगिक अनुकुलतेची मागणी केली. यास नकार दिल्यावर तिला संशयिताने जीवे मारण्याची धमकी दिली.

शिवाय संशयिताने दि. 3 पासून 16 जानेवारी पर्यंत पीडितेचा पाठलाग केला. या प्रकाराला घाबरून पीडितेने शुक्रवारी पोलिसांत धाव घेत रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भा. दं.सं.च्या 354 अ, 354 ड, 448, 509, 504, 506(2) या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला व पोलिसांनी अज्ञात संशयिताचा शोध जारी केला.

या भागातील सीसीटिव्ही फुटेजची पोलिसांनी पडताळणी केली. त्यानुसार संशयिताच्या दुचाकी पोलिसांनी ओळख पटवली व त्याद्वारेवरील संशयितास शनिवारी 20 रोजी पकडून अटक केली. तसेच दुचाकी जप्त केली. संशयिताला म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत खरात यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन व उपअधीक्षक संदेश चोडणकर करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT