Colvale jail Dainik Gomantak
गोवा

Colvale jail: कोलवाळ कारागृहात कडक सुरक्षा बंदोबस्त! कैद्यांना बाहेरचे खाद्यपदार्थ देण्यास बंदी, अमलीपदार्थ व्यवहाराच्या आरोपानंतर निर्णय

Colvale Jail Security Tightened Over Drug Allegations: तेलंगणच्या अमलीपदार्थ विरोधी पोलिस पथकाने कोलवाळ कारागृहातून अमलीपदार्थांचे व्यवहार कैदी हाताळतो असा आरोप केल्यावर आता कारागृहाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: तेलंगणच्या अमलीपदार्थ विरोधी पोलिस पथकाने कोलवाळ कारागृहातून अमलीपदार्थांचे व्यवहार कैदी हाताळतो असा आरोप केल्यावर आता कारागृहाची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कैद्यांना नातेवाईक व भेटायला येणाऱ्यांकडून खाद्यपदार्थ स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कारागृह परिसरात १६ मोबाईल जप्त करण्यात आले होते. त्यानंतर हे मोबाईल कारागृहात कसे पोचतात याची चौकशी करण्यात आली. अगदी कमी जाडीचे आणि तळहातावर लपवता येणारे असे मोबाईल खाद्यपदार्थांत विशेषतः चपात्यांत लपवून कैद्यांपर्यंत पोचवले जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

याचमुळे कारागृह अधीक्षकांनी कैद्यांना बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ देण्यास बंदी घालणारे परिपत्रक जारी करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्या परिपत्रकात गोव्याच्या (Goa) केंद्रीय कारागृहातील कैद्यांना आता भेटीस येणाऱ्या नातेवाइकांकडून अन्नपदार्थ स्वीकारण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. त्याऐवजी आता कारागृहात ‘पूर्ण क्षमतेने कार्यरत कॅंटीन’ सुरू झाल्यामुळे ही नवीन अंमलबजावणी केली जात आहे. या निर्णयामागे प्रमुख हेतू असा आहे की, कारागृहात मोबाईल फोनसारखी प्रतिबंधित वस्तू अन्नाच्या माध्यमातून गुप्तपणे आत आणली जाऊ नये.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अन्नाच्या माध्यमातून विशेषतः मोबाईल फोन, तंबाखू व अमलीपदार्थांची तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भेटीच्या वेळी काही नातेवाईक अन्नपाकिटांमध्ये या वस्तू लपवून कैद्यांना देत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

दोन महिन्यांपूर्वी चार पोलिस अधिकारी ज्यामध्ये एका उपअधीक्षकाचा समावेश आहे, त्यांना कारागृहात अमलीपदार्थांची तस्करी केल्याच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले होते. गोवा मानवी हक्क आयोगाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये दिलेल्या अहवालात, कारागृहात मोबाईल (Mobile) जॅमर्स बसवावेत आणि सीसीटीव्ही प्रणाली कार्यक्षम ठेवावी अशी शिफारस केली होती.

याशिवाय, कारागृह प्रशासनाने गेल्या ऑगस्टमध्ये ‘स्मार्ट कार्ड फोन प्रणाली’ सुरू केली होती, ज्या अंतर्गत सात फोन बसवण्यात आले होते, जेणेकरून कैदी आपल्या कुटुंबीयांशी आणि वकिलांशी संपर्क करू शकतील. हा उपक्रम मोबाईल फोनची तस्करी रोखण्यासाठीच राबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते.

परिपत्रकातील सूचना

कोलवाळ केंद्रीय कारागृहातील सर्व कैद्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात येते की आता कोणत्याही कैद्याला त्याच्या नातेवाईकांकडून अन्न घेण्यास परवानगी दिली जाणार नाही.

कैद्यांना नियमित आहाराशिवाय कॅंटीनमधून अतिरिक्त अन्नपदार्थ विकत घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

नातेवाईकांना कैद्याच्या खात्यात रक्कम जमा करता येईल, ज्याचा वापर कैदी कॅंटीनमधून वस्तू खरेदी करण्यासाठी करू शकतील.

अन्नाच्या पाकिटातून ‘मिनी मोबाईल फोन’

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अलीकडे जप्त करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये सर्वाधिक आढळणाऱ्या गोष्टी म्हणजे “मिनी मोबाईल फोन्स” जे बोटाइतके लहान असूनही त्यांची सिग्नल पकडण्याची क्षमता चांगली असते. अलीकडील तपासांमध्ये असे आढळले की काही विशिष्ट ब्रँडचे मिनी मोबाईल फोन अन्नपॅकेजिंग आणि चपात्यांमध्ये लपवून कैद्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना दिले जात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "गोव्यात येऊन मला आनंद झाला" पी. अशोक गजपती राजू (राज्यपाल)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

Travel Horoscope: दूरचा प्रवास करताय? काही राशींसाठी आजचा दिवस लाभदायक, काहींनी जपून राहावे; वाचा तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT