Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात सांडपाण्याची समस्या; 'मानवाधिकार'कडून सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस

Colvale Jail Sewage Problem: कोलवाळ येथील कारागृहात पसरलेली सांडपाण्याची दुर्गंधी आणि अस्वच्छतेची गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कोलवाळ येथील कारागृहात पसरलेली सांडपाण्याची दुर्गंधी आणि अस्वच्छतेची गोवा मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. कारागृहाच्या व्हिजिटर्स बोर्डाचे सदस्य ॲड. सावियो त्रावासो यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील कारागृहातील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे स्पष्ट केल्याने अयोगाने खात्याला नोटीस जारी करून ११ सप्टेंबर रोजी उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.या तक्रारीत नमूद केले आहे की, २०२१ पासून कारागृह परिसरात सांडपाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या अस्वच्छतेमुळे निर्माण झालेल्या तीव्र दुर्गंधीचा तेथील कैदी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असून संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. ‘पीडब्ल्यूडी’ विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

याप्रकरणी आयोगाने गोव्याचे मुख्य सचिव, कारागृह महानिरीक्षक यांनाही प्रतिवादी केले आहे. मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती भारत देशपांडे, सदस्य डेस्मंड डिकॉस्टा आणि सदस्य प्रमोद कामत यांच्या खंडपीठाने याप्रकरणी ‘पीडब्ल्यूडी’ खात्याचा हलगर्जीपणा आणि विलंब कारणीभूत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट केले आहे. यामुळे कारागृहातील कैदी व कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे निरीक्षण आयोगाने नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

संपादकीय: इन्स्टाग्रामवर हरलेले सत्ताधीश

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? एरियर मिळणार की नाही? पगारवाढीबाबतचे सर्व प्रश्न आणि उत्तरे एका क्लिकवर

Goa Politics: गोव्यात महाआघाडीचे समीकरण जुळणार? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सहभागाची शक्यता

Hardik Pandya Birthday: कधीकाळी क्रिकेट किट घ्यायलाही नव्हते पैसे, मॅगी खाऊन काढले दिवस; आज टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर! हार्दिक पांड्याचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT