Colvale Jail Crime Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail: कैद्याकडून वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी! कोलवाळ कारागृहात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Colvale Jail Crime News: डॉ. गोवेकर हे दवाखान्यात आपली सेवा बजावत होते. याचवेळी कैदी आगुस्तीन कार्व्हालो हा दवाखान्यात घुसला व डॉक्टरांना शिवीगाळ करीत, गंभीर परिणामाची त्याने धमकी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail Prisoner Threat To Medical Officer

म्हापसा : कोलवाळ कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश गोवेकर यांना आगुस्तिन कार्व्हालो या कैद्याकडून धमकी देण्यात आली आहे. सेवा बजावताना दवाखान्यात शिरून तसेच अंगरक्षकाच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्यामुळे कारागृहातील दवाखाना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या एकंदर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अलीकडेच हा धमकीचा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. गोवेकर यांनी तुरुंग प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दवाखान्यात आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी तुरुंग महानिरीक्षकांकडे केली आहे.

घटनेवेळी डॉ. गोवेकर हे दवाखान्यात आपली सेवा बजावत होते. याचवेळी कैदी आगुस्तीन कार्व्हालो हा दवाखान्यात घुसला व डॉक्टरांना शिवीगाळ करीत, गंभीर परिणामाची त्याने धमकी दिली.

या प्रकारावेळी डॉक्टरांना अंगरक्षक म्हणून सेवा बजावणारा सहाय्यक जेलर हा अधिकारी तिथे उपस्थित होता. मात्र त्याने या संशयित कैद्याच्या कृतीमध्ये हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे या अंगरक्षक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील कारागृहातील अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

२०२२ मध्येही हल्ला!

यापूर्वी दोन वर्षांपूर्वी एप्रिल २०२२ मध्ये कैदी सायरन रॉड्रिगज यांनी कारागृहाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी ड़ॉ. दिलीप कुंकळ्येकर यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर एका साहाय्यक जेलरची कारागृहातील दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अंगरक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT