Colvale Jail  Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail : कोलवाळच्या तुरुंगरक्षकांवर प्रचंड ताण; कर्मचाऱ्यांची कमतरता

Colvale Jail : : 562 कैद्यांवर देखरेख ठेवतात केवळ 96 कर्मचारी, सरकारची उदासीनता

गोमन्तक डिजिटल टीम

विलास महाडिक

Colvale Jail : पणजी, राज्यातील एकमेव कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग कर्मचाऱ्यांची भरती गेली अनेक वर्षे करण्यात आली नसल्याने त्याचा परिणाम दैनंदिन सुरक्षेवर पडत आहे. सध्या कारागृहात असलेल्या ५६२ कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी ९६ च्या आसपास तुरुंगरक्षकांची संख्या असली तरी तीन पाळ्यांमध्ये एका वेळेस ३० कर्मचारी ड्यूटीवर तैनात असतात.

त्यामुळे अनेकदा कैद्यांवर नियंत्रण ठेवताना तुरुंग रक्षकांना अपयश येते व कारागृहामध्ये कैद्यांमधील गटामध्ये ‘राडा’ होण्याचे प्रकार वारंवार घडण्याचे प्रकार घडतात. तुरुंगरक्षकांना ड्यूटीवर विश्रांती न घेता सतत १२ - १२ तास काम करण्याची नामुष्की येत आहे.

आग्वाद व सडा-वास्को येथील दोन्ही तुरुंग बंद करून एकच मध्यवर्ती कारागृह कोलवाळ येथे कच्चे कैदी व शिक्षा झालेल्या कैद्यांसाठी उभारण्यात आले आहे. या कारागृहात प्रशासन व तुरुंग कर्मचारी मिळून सुमारे २७४ संख्या मंजूर आहे.

त्यापैकी सध्या १०५ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, त्यामध्ये अधिकतर तुरुंगरक्षक आहेत. कैद्यांच्या खोल्यांवर पहारा ठेवण्यासाठी तसेच देखरेख ठेवण्यासाठी १४८ कर्मचारी खात्याने मंजूर केलेले असताना सध्या ९६ जण काम करत आहेत. अनेक कर्मचारी निवृत्त झाले तर काहींचा कोविड काळात मृत्यू झाल्याने त्याच्या जागी बदली नवीन तुरुंगरक्षकांची वर्णी लावण्यात आली नाही.

तुरुंग रक्षकांवर ताण

कारागृहातील सुरक्षेचे काम तीन पाळ्यांमध्ये चालते मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे सध्या हे काम दोन पाळ्यांतच सुरू आहे. पाळीनुसार नऊ तुरुंग रक्षकांची वर्णी लावणे आवश्‍यक आहे त्या ठिकाणी २ किंवा ३ तुरुंग रक्षक असतात.

बदली तुरुंग रक्षक येत नाही तोपर्यंत ड्युटीवर असलेला तुरुंग रक्षक जाऊ शकत नाही. काहीवेळा ड्यूटीवर असणारा तुरुंग रक्षक न आल्यास सतत ड्यूटी करण्याची वेळ येते. त्यामुळे कामावर व आरोग्यावर परिणाम होत आहे.

फक्त तीनच महिला कर्मचारी

५६२ कैद्यांत ३७ महिला कैद्यांचाही समावेश आहे. या कैद्यांवर देखरेख ठेवण्यासाठी फक्त तीनच महिला तुरुंग कर्मचारी आहेत.

या तिन्ही सहाय्यक जेलर पदावर काम करत असल्याने महिला कैद्यांच्या खोल्या बंद करण्यासाठी गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या महिला सुरक्षारक्षकांची मदत घेतली जात आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी रिक्त जागा भरण्यासाठी खात्याकडून वेळोवेळी प्रयत्न करण्यात येत असले तरी सरकारकडून साथ न मिळाल्याने ही रिक्त जागांची संख्या वाढतच आहे.

सुमारे ५२ पदे रिक्त

सुमारे ५२ रिक्त आहेत. गेल्या २०१५ सालापासून या खात्याने नव्या तुरुंगरक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे त्याचा ताण तुरुंगरक्षकांना सलग ड्यूटी करण्यावर पडत आहे.

रिक्त जागा भरण्यासाठी कारागृह खात्याकडून सरकारला अनेकदा प्रस्ताव पाठवण्यात आले मात्र या जागा भरण्यासाठी वेळेवर गृह खात्याकडून तेव्हा मंजुरीच आली नव्हती. कारागृहात एखाद्यावेळी दोन कैद्यांच्या गटात हाणामारी झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवताना उपस्थित तुरुंग अधिकारी तसेच तुरुंगरक्षकांच्या नाकीनऊ येते.

एकूण ५६२ कैदी

कोलवाळ येथील कारागृहात कच्चे कैदी व शिक्षा झालेले मिळून ५६२ कैदी आहेत. यामध्ये गोमंतकीय तसेच देशी व विदेशी कैद्यांचा समावेश आहे. त्यातील ७५ जण अमलीपदार्थ, खून तसेच बलात्कार यासारख्या गुन्ह्यात झालेली शिक्षा भोगत आहेत, तर ४८७ हे कच्चे कैदी आहेत. २६ कैद्यांना कारागृहातील स्वयंपाक विभागात जेवण तयार करण्याचे काम देण्यात आले आहे, त्यामध्ये कच्चे कैदी व शिक्षा झालेल्यांचा समावेश आहे.

६२५

कारागृहाची कैद्यांची क्षमता

५६२

कारागृहात असलेले कैदी

७५

शिक्षा झालेले कैदी

४८७

कच्चे कैदी

५२५

पुरुष कैदी

३७

महिला कैदी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT