Colvale Jail Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail:''कैद्यांनी तयार केलेले आकाशकंदिल त्यांना स्वयंपूर्ण करतील''

कैद्यांनी बनवलेल्या वस्तु मंत्रालयामार्फत विकल्या जातात

दैनिक गोमन्तक

दिवाळीच्या निमित्ताने दीपोत्सवासाठी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी रंगीत कागद आणि जुनी मासिके अशा विविध साहित्याचा वापर करून ‘आकाश कंदील’तयार केले आहेत. हे उपक्रम त्यांना भविष्यात स्वयंपुर्ण बनवतील असे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक गौरीश कुर्तिकर यांनी (superintendent of central jail ) यांनी म्हटले आहे.

(Colvale jail inmates make akash kandil to spread light of happiness)

कैद्यांना त्यांच्या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि नवीन कौशल्ये शिकता यावीत यासाठी कोलवाळ मध्यवर्ती कारागृह प्रशासन विविध उपक्रम घेत असते. यात मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक गौरीश कुर्तिकर यांच्यासह इतर कर्मचारी कैद्यांना यासाठी प्रोत्साहित करत असतात.

कैद्यांनी तयार केलेल्या साहित्यामध्ये लाकडी शोपीस, बांबूच्या वस्तू, नारळाच्या वस्तु, सुगंधित मेणबत्त्या, कागदी पिशव्या ( दररोज सरासरी 300 ) आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. कैद्यांनी बनवलेले ह्या वस्तु मंत्रालयामार्फत विकल्या जातात, अशी माहिती ही कारागृह अधिकाऱ्यांनी दिली.

कारागृहाचे अतिरिक्त महानिरीक्षक वासुदेव शेट्ये यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, कोलवाळ कारागृहात बंदिस्त असलेल्या कैद्यांना समजून घेणे आणि त्यांना नवकार्यासाठी प्रवृत्त करणे तुरुंग अधिकाऱ्यांसाठी खूप आव्हानात्मक आहे. जेव्हा एखादा आरोपी तुरुंगात असतो, तेव्हा कैद्याला परिस्थिती समजण्यास वेळ लागतो आणि तुरुंगातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याशी संवाद साधणे आणि संवाद साधणे हे आव्हान असे शेट्ये म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

SCROLL FOR NEXT