Colvale Jail Attack Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail Attack: लाथाबुक्क्यांनी तुडवले, तुरुंग कर्मचारी धावले अन् देवराजला वाचवले! कोलवाळ कारागृहात पुन्हा कैद्यावर हल्ला; अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे

Colvale Jail Inmate Attack News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे पुन्हा एकदा निघाले आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचे धिंडवडे पुन्हा एकदा निघाले आहेत. अवघ्या आठवड्याभरात कैद्यावर झालेल्या दुसऱ्या हिंसक हल्ल्यामुळे तुरूंग प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर आणि कायद्याच्या सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २६ मे रोजी रात्री १० वा.च्या सुमारास तुरुंगातीलच सहकारी कैद्याने ४५ वर्षीय देवराज नावाच्या कैद्यावर अचानक हल्ला चढवला. या कैद्याने देवराज याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात देवराज जखमी झाला. यावेळी घटनास्थळी धाव घेत तुरुंग कर्मचाऱ्यांनी जखमी देवराजची संशयित कैद्याच्या तावडीतून सुटका केली.

तुरुंग प्रशासनाने जखमी कैद्यावर तातडीने प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्याला म्हापसा जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. विशेष म्हणजे, ही घटना मंगळवारी रात्री घडलेली असतानाही, बुधवार, २७ रोजी सायंकाळी उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाकडून कोलवाळ (Colvale) पोलिसांत याप्रकरणी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

कायदा, सुव्यवस्था कोलमडली

कोलवाळ कारागृहात हिंसेची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी शनिवारी (२३ मे) दुपारी अशीच एक घटना घडली होती, ज्यामध्ये अंडर ट्रायल राकेश पाटील या कैद्याला नारायण ऊर्फ बाबू भालेकर याने बेदम मारहाण केली होती. ही घटना ताजी असतानाच, अवघ्या तीन ते चार दिवसांत पुन्हा झालेला हा दुसरा हल्ला कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचे नियोजन, कैद्यांवर ठेवले जाणारे लक्ष आणि एकूणच तिथली कायदा व सुव्यवस्था पार कोलमडल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT