Two Inmate Fight Inside Colvale Jail 
गोवा

Colvale Jail Goa: कोलवाळ कारागृहात पुन्हा राडा; एका कैद्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला पेन

Goa Crime News: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात नेहमीच विविध घटना घडत असतात, येथे कैद्यांमध्ये वारंवार वाद होत असतात.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृह पुन्हा एकदा कैद्यांमध्ये राडा झाला असून एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या डोळ्यात पेन खुपसून हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली.

या हल्ल्यात कैदी अझिज आसिफ हा गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने आपल्यावर कशासाठी हल्ला केला हे आपणास माहिती नाही. मी झोपलेलो असताना अचानक पेनाच्या साहाय्याने संशयिताने माझ्यावर हल्ला चढविला असे, जखमी अझिजने सांगितले.

या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याला व चेहऱ्यावर दुखापत झाली आहे. त्याला म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचारासाठी आणले असता, माध्यमांनी त्यांना वाटेत गाठून त्याला वरील घटनेबाबत विचारले. त्यावर अझिजने ही माहिती दिली.

दरम्यान, कोलवाळ कारागृहात वारंवार अशा घटना घडत असतात. एक वर्षापूर्वी कारागृहात टोळीयुद्ध रंगले होते. यात काही कैदी जखमी झाले होते. तसेच, एका कैद्याने वैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता.

याशिवाय कैदी राजू दास याने सॅनिटायझर पिऊन तसेच अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोलवाळ या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

SCROLL FOR NEXT