Goa road accident  Dainik Gomantak
गोवा

Colvale Accident: नियंत्रण सुटले अन् कोलवाळ पुलावरील 'तो' अपघात ठरला जीवघेणा; 25 वर्षीय समृद्धीचे निधन

Goa bridge accident news: खोर्ली म्हापसा येथील २५ वर्षीय समृद्धी हिचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान पहाटे निधन झाले

Akshata Chhatre

कोलवाळ: दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कोलवाळ येथे झालेल्या गंभीर अपघातात समृद्धी वायंगणकर हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खोर्ली म्हापसा येथील २५ वर्षीय समृद्धी हिचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान पहाटे निधन झाले. म्हापसा पालिकेच्या विद्यमान नगरसेविका शुभांगी वायंगणकर आणि माजी नगरसेवक गुरूदास वायंगणकर यांची ती कन्या होती.

अपघात कसा झाला?

२० एप्रिल रोजी सकाळी कोलवाळ पुलावर हा गंभीर अपघात झाला. पेडणेहून कोलवाळला येणाऱ्या दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने गाडी कलंडली आणि अपघात झाला.

या अपघातात समृद्धीचं डोकं पुलाच्या फुटपाथला आदळल्याने ती जागीच बेशुद्ध होऊन पडली. यावेळी समृद्धीची मैत्रीण सिध्दाली महाले (२४, गिरी) ही गाडी चालवत होती ती देखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

सिध्दाली महाले हिचा अपघातात पाय मोडला होता. तिला काही उपचारांनंतर घरी पाठवण्यात आले मात्र समृद्धीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर उपचार सुरूच होते. उपचार सुरु असतानाच २० मे रोजी समृद्धीने प्राण सोडले.

तिच्यावर संध्याकाळी ४:३० वाजता खोर्ली येथील शांतीवन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. या अपघाताचा पंचनामा पेडणे पोलीस उपनिरीक्षक विवेक हळर्णकर व हवालदार विनायक तळावणेकर यांनी केला आणि सध्या पोलीस या अपघाताचा आणखीन तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT