colva fire incident Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांच्या फटाक्यांमुळे मच्छिमाराचे 'रापण' खाक; मोठ्या आर्थिक नुकसानानंतर भरपाईची मागणी!

colva fisherman fire incident: या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे

Akshata Chhatre

बेताळभाटी: नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष एका कष्टकरी मच्छिमारासाठी दुर्दैवी ठरला आहे. कोलवा येथील मच्छिमार सेंटन फर्नांडिस यांचे 'रापण' म्हणजेच मासेमारीचे जाळे मध्यरात्री लागलेल्या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. या आगीमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेताळभाटी समुद्रकिनाऱ्यावर (३१ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. सेंटन फर्नांडिस यांनी आरोप केला आहे की, समुद्रकिनाऱ्यावर काही पर्यटक मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करत होते. या फटाक्यांमधील एक ठिणगी किनाऱ्यावर ठेवलेल्या त्यांच्या मासेमारीच्या जाळ्यावर पडली आणि क्षणार्धात आगीने रौद्र रूप धारण केले.

जीवरक्षक आणि स्थानिकांची धावपळ

जाळ्याला आग लागल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित असलेले जीवरक्षक आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेतली. सर्वांनी मिळून पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळात आग नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत मासेमारीसाठी वापरले जाणारे महागाचे जाळे पूर्णपणे जळून कोळसा झाले होते.

आर्थिक संकट आणि मदतीची मागणी

सेंटन फर्नांडिस यांच्यासाठी हे जाळे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन होते. या घटनेमुळे त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. "पर्यटकांच्या एका छोट्याशा चुकीमुळे माझे वर्षभराचे कष्ट मातीत मिळाले आहेत," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यांनी शासनाला विनंती केली आहे की, या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

VIDEO: कळंगुटमध्ये पर्यटकांपेक्षा तंबाखू-दारु पिऊन फिरणाऱ्यांचीच 'तोबा' गर्दी, सरत्या वर्षाला अशा प्रकारे निरोप; गर्दीचे विदारक वास्तव मांडणारा व्हिडिओ चर्चेत

New Year 2026: इंग्रजी वर्षाची सुरुवात सूर्यनमस्कार आणि योगाभ्यासाने! तांबडी सुर्ला महादेव मंदिरात शेकडो तरुणांचा उत्साह

SCROLL FOR NEXT