Tourist Death due to negligence Dainik Gomantak
गोवा

‘त्या’ मृताच्या कुटुंबीयांकडून नुकसान भरपाईची मागणी

कोलवा येथे गेल्या आठवड्यात वीज धक्क्याने मरण पावलेल्या जयपूर-राजस्थान येथील व्यक्तींच्या कुटुंबीयांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. या मागणीला स्थानिकांनीही पाठिंबा दिला आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : कोलवा येथे गेल्या आठवड्यात वीज धक्क्याने मरण पावलेल्या जयपूर-राजस्थान येथील व्यक्तींच्या कुटुंबीयांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मरण पावलेली व्यक्तीच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व वयस्क वडील आहेत. त्यांच्या या मागणीला स्थानिकांनीही पाठिंबा दिला आहे.

कुटुंबातील अन्य सदस्यांनी कोलवा येथे येऊन ज्या ठिकाणी त्या व्यक्तीला विजेचा धक्का बसला ती जागा पाहिली आणि वीजवाहिनी उघडी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकार म्हणजे सरकारी खात्याचा निष्काळजीपणा असल्याचे कुटुंबीयातील सदस्य म्हणाले.

ज्या ठिकाणी वीजवाहिनी उघडी आहे तिथे जवळच मुलांना खेळण्याची जागा आहे. या ठिकाणी शेकडो मुले खेळायला येतात. या निष्काळजीपणासाठी सरकारने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला म्हणून स्थानिक आमदार वेन्झी व्हिएगस यांचे स्थानिकांनी अभिनंदन केले. दरम्यान, कोलवा पोलिस स्थानकाने वीज खात्याकडून या घटनेसंबंधी अहवाल मागितला असून, तो आल्यावर चौकशीला सुरवात होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

SCROLL FOR NEXT