Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

Colva: कोलवा बीचवर भांडण! झिंज्या उपटत आरडाओरड, पोलिसांनाही मारहाण; बेळगावच्या 3 महिलांना शिक्षा

Colva Beach: न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, वरील तिन्ही संशयित आरोपींनी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आपापसात कडाक्याचे भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला.

Sameer Panditrao

मडगाव: कोलवा समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांशी भांडण करताना एकमेकांच्या झिंज्या उपटून आरडाओरडा करत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याचा आरोप असलेल्या बेळगावच्या तीन महिलांना मडगाव न्यायालयाने काल शुक्रवारी दोषी ठरवून दंडाची शिक्षा ठोठावली. कस्तुरी ऊर्फ जान्हवी सबळे (२७), महादेवी ऊर्फ मधू पाटील (३०) आणि यल्लव्वा पाटील (५०) अशी त्यांची नावे आहेत.

न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रानुसार, वरील तिन्ही संशयित आरोपींनी कोलवा समुद्रकिनाऱ्यावर आपापसात कडाक्याचे भांडण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. त्‍यांच्‍या या कृत्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली.

त्‍यावेळी भांडण सोडविण्यास गेलेल्या महिला पोलिसांनाही या महिलांनी मारहाण केली होती. त्‍यांच्‍याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय दंडसंहितेच्‍या २०२३च्या १९४ (२) कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. सदर घटना सहा-सात महिन्‍यांपूर्वी घडली होती.

तिन्ही संशयित महिलांनी न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला. त्‍यामुळे मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने त्‍यांना दोषी ठरवून प्रत्येकी एक हजार रुपयाचा दंड ठोठावला. दंडाची ही एकूण ३ हजार रुपयांची रक्कम आरोपींनी भरल्यास ती राज्य सरकारच्या तिजोरीत जमा करावी, असेही न्यायालयाने आपल्‍या आदेशात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"प्लीज, कोणालाही सांगू नका!", डोनाल्ड ट्रम्प यांनी उडवली फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाची जाहीर खिल्ली; औषधांच्या किमतीवरुन दिला होता दम

Horoscope: बुद्धी आणि चातुर्याचा विजय! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे राशी भविष्य

Spot Fixing Scandal: क्रिकेट विश्वाला हादरवणारी 'अंडरकव्हर' स्टोरी! स्टॉपवॉच अन् रेकॉर्डिंगनं कसं उद्ध्वस्त केलं खेळाडूंचं करिअर? आकाश चोप्राचा व्हायरल VIDEO चर्चेत

''जर धडा शिकवला नाहीतर पैसे परत..!" सडकछाप भाषेत पाकिस्तानची भारताला धमकी; चिमुकल्यांचा वापर करुन स्पाय नेटवर्क चालवण्याचा ISI चा कट VIDEO

अर्जुन रामपालने गोव्यात मित्रांसोबत पाहिला 'धुरंधर', लुटला खास मेजवानीचा आस्वाद; Photos Viral

SCROLL FOR NEXT