Accidents in Goa Dainik Gomantak
गोवा

Accidents in Goa: बस्तोडा राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर कार-रिक्षाची जोरदार धडक; एकजण गंभीर जखमी

रिक्षाचालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Accidents in Goa: गोव्यात रस्ते अपघातात विलक्षण वाढ झाली आहे. वाहतूक पोलीस विभाग हे अपघात थांबावेत यासाठी सतर्क असून अपघात होण्याच्या कारणांचा समूळ नाश करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तरीही म्हणावे तशा या घटना कमी झाल्याचे चित्र दिसत नाही.

गोव्यातील तार बस्तोडा इथे काही वेळापूर्वी अपघात घडला आणि यामध्ये एकजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बस्तोडा येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलावर हा अपघात घडला आहे. कार आणि प्रवासी रिक्षा यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षाचालक यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. रिक्षाचालकाला वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, गोव्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोवा वाहतूक पोलीस आणि सरकार अधिकच सतर्क झाले आहे. जास्त करून अपघात हे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानेच होतात हे निदर्शनास आल्यावर वाहतूक पोलीस विभाग अॅक्शन मोडमध्ये आहे. राज्यभरात ठिकठिकाणी पोलिसांनी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करत दंड आकारण्यास सुरुवात केली आहे.

शुक्रवारी गोवा पोलिसांनी राज्यभरात सुमारे 2,000 वाहतूक उल्लंघनांवर गुन्हा दाखल करून केवळ एका दिवसात 10 लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला. यावेळी डेप्युटी एसपी सिद्धांत शिरोडकर म्हणाले की, गेल्या वर्षी याच दिवशी वाहतूक पोलिसांनी अवघे दोन लाख रुपये जमा केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT