Goa College Admission Process Will Start From 10 May 2024 Dainik Gomantak
गोवा

Goa College Admission Process: राज्यातील महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया १० मेपासून; गुणवत्ता यादीनुसार प्रवेश

Latest Update on Admission Process in Goa Colleges: राज्यातील बारावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीचे खापर इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटवर फोडण्यात आले आहे. यंदा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी कोविडच्या वेळी दहावीत होते. त्यामुळे त्यांना सारे काही ऑनलाइन शिकण्याची सवय झालेली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa College Admission Update:

पणजी, गोवा शालान्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने काल बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षणाचे वेध लागले असून पदवी शिक्षणाच्या प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला १० मेपासून प्रारंभ होणार आहे.

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात महाविद्यालयीन वर्गांना सुरवात होणार असल्याचे उच्च शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी सांगितले.

यंदा प्रथम आणि द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम हा नवीन शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने असेल. पुढच्या वर्षी तृतीय वर्षाचा अभ्यासक्रम हा नवीन शिक्षण धोरणानुसार सुरू होणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे सर्व महाविद्यालयांची एकत्रित प्रवेश प्रक्रिया राबविली गेली होती, त्याच पद्धतीने यंदाही राज्यातील सर्व महाविद्यालयांतर्फे एकत्रित परीक्षा घेण्यात येणार आहे व गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.

कमी निकालाचे खापर इलेक्ट्रॉनिक गॅझेटवर

राज्यातील बारावीच्या निकालाच्या घसरलेल्या टक्केवारीचे खापर इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटवर फोडण्यात आले आहे. यंदा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी कोविडच्या वेळी दहावीत होते. त्यामुळे त्यांना सारे काही ऑनलाइन शिकण्याची सवय झालेली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हे विद्यार्थी ऑनलाइन असतात.

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी निकाल कमी का लागला याची कारणमीमांसा करताना सांगितले, की राज्यातील शिक्षक चांगले काम करत आहेत; मात्र विद्यार्थी कष्ट करण्यात कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापर वाढल्याच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येत नाही. अशा विविध कारणांमुळे यंदाचा निकाल कमी लागला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT