Rosary College  Dainik Gomantak
गोवा

Goa College: 'या' महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार उघडकीस

रोझरी महाविद्यालयातील प्रकार: उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून चक्क दंड वसुली, गोवा विद्यापीठाकडून गंभीर दखल

दैनिक गोमंतक

Goa College Latest News: उशिरा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 50 रुपयांची बेकायदेशीर वसुली करण्याचा प्रकार एका व्हिडिओमुळे उघड झाला असून विद्यार्थ्यांना शिस्त लागावी म्हणून आम्ही हा दंड वसूल करत होतो, असा निर्लज्ज खुलासा महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून केला गेल्याने विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची गोवा विद्यापीठानेही गंभीर दखल घेतली आहे.

नावेली येथील रोझरी महाविद्यालयात गेल्या काही दिवसांपासून महाविद्यालयात उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून 50 रुपयांचा दंड घेऊन प्रवेश दिला जात होता. याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बेकायदा दंडवसुली बंद करण्यात आली आहे.

उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी हा दंड आकारला जात होता, असे स्पष्टीकरण आता कॉलेज प्रशासनाने दिले आहे.

या संबंधी गोवा विद्यापीठाकडे संपर्क साधला असता यापूर्वी महाविद्यालयाच्या प्राचार्याची बैठक घेतली असता असे प्रकार होत असतील तर ते त्वरित बंद करावेत, अशी स्पष्ट ताकीद कुलगुरुंनी प्राचार्यांना दिली होती. मात्र, ही ताकीद गांभीर्याने घेतली गेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिस्तीची सबब

मुलांना कॉलेजमध्ये प्रवेशासाठी दंडाची रक्कम वसुल करणे बेकायदशीर आहे, गोवा विद्यापीठाकडूनही याबाबत कोणत्याही प्रकारचे निर्देश दिलेले नाहीत.

तरीही कॉलेजकडून अशाप्रकारे बेकायदा वसुली केली जात असल्याचे व्हीडीओतून स्पष्ट होते. नावेलीतील रोझरी महाविद्यालयातील या प्रकाराबाबत प्रा. हेलिक बार्रेटो यांनी शिस्तीचे स्पष्टीकरण दिले आहे.

‘अभाविप’नेही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांना असा वेठीस धरण्याचा प्रयत्न झाल्यास आमची संघटना रस्त्यावर उतरेल.

-धनश्री मांद्रेकर,‘अभाविप’च्या

राज्य निमंत्रक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT