Cold Dainik Gomantak
गोवा

Cold Wave in Goa : राज्यात तापमानाचा पारा घसरला, थंडी वाढली

येत्या दिवसात अजून 1 ते 2 अंशांनी किमान तापमानात घट होणार असल्याने राज्यात कडाक्याची थंडी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात पुन्हा थंडीला सुरुवात झाली आहे. हळूहळू गारवा वाढू लागला आहे. गेले कित्येक दिवस राज्यातील उष्मा वाढला होता, मात्र आता पुन्हा थंडीची हुडहुडी राज्यभर वाढणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. राज्यातील किमान तापमान 20 अंशांवरुन ते 18.5 अंशावर पोहोचले आहे.

येत्या दिवसात अजून 1 ते 2 अंशांनी किमान तापमानात घट होणार असल्याने राज्यात कडाक्याची थंडी नागरिकांना अनुभवता येणार आहे. वैज्ञानिक एम. राहुल म्हणाले, कालच्या तुलनेत किमान तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे. येत्या 48 तासांत पुन्हा 1 ते 2 अंश सेल्सिअस घट होणार आहे.

सर्दी खोकल्याच्या रुग्णांत वाढ

हवामान बदलांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी पडत आहेत. सर्दी, खोकला, पडसे आदींच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. गरम कपड्यांचा वापर करणे, तेलकट पदार्थ टाळणे, गरम पाणी पिणे, संतुलित आहार करण्याचा सल्ला देण्यात येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

Pakistan Afghan Tension: पाकिस्तानात मोठी चकमक! 4 आत्मघाती हल्लेखोरांसह 25 दहशतवादी ठार, पाक-अफगाण सीमेवर पुन्हा तणाव; स्फोटकांचा साठा जप्त

Two US Navy Aircraft Crash : 30 मिनिटांत 2 अपघात! दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि फायटर जेट क्रॅश; 5 नौदल अधिकारी जखमी VIDEO

SCROLL FOR NEXT