Margao Corporation :  Dainik Gomantak
गोवा

Margaon Corporation : मडगावात शहाळ्यांच्या करवंट्यांचे ढीग..! पालिकेपुढे मोठा प्रश्न

Margao Corporation : विक्रेत्यांवर कारवाईची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Corporation : फातोर्डा, मडगाव शहरात रस्त्याच्या कडेला अनेक शहाळे विक्रेते आपला व्यवसाय करीत असून आपल्याकडील शहाळ्यांची विक्री झाल्यानंतर त्यांच्या करवंट्या रस्त्याचा कडेला किंवा एखाद्या आडोशाला फेकून देत आहेत.

त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी या करवंट्यांचे ढीग साचलेले दिसत आहेत. या शहाळ्याच्या करवंट्यांच्या कचऱ्याचे करायचे काय? असा प्रश्न नगरपालिकेसमोर निर्माण झाला आहे.

या शहाळ्यांच्या टाकाऊ कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने या शहाळ्यांचा कचरा नगरपालिकेचे कचरावाहू ट्रक हा कचरा नेण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे शहाळे विक्रेते रात्रीच्यावेळी गुपचूप, कचरा वर्गीकरणाच्या ठिकाणी, रस्त्याचा आडोशाला किंवा निर्मनुष्य ठिकाणी हा कचरा टाकून देत आहेत.

शहाळ्याला मोठी मागणी असल्याने शहाळे विक्रेते कर्नाटक, केरळ या राज्यांतून शहाळे आणून शहरात दररोज हजारोंच्या संख्येने शहाळ्यांची विक्री करतात. एका शहाळ्याचा दर ४० ते ५० रुपये असा आहे. शहरात या शहाळ्याची विक्री हातगाड्यांवर, रस्त्याच्या कडेला, पिकअप रिक्षातून केली जात आहे.

मडगाव नगरपालिकेने शहरातील ब्लॅक स्पॉटचा कचरा बाणावली पंचायत क्षेत्रातून जात असलेल्या बाह्य रस्त्याच्या भरावासाठी नेला होता. यात इतर कचऱ्याबरोबर मोठ्या प्रमाणात शहाळ्यांच्या करवंट्यांचाही समावेश होता.

येथे नगरपालिकेने टाकलेला कचरा हटविण्याची मागणी आमदार व्हेंझी व्हिएगस, पंचायत व नागरिकांनी केली आहे. बाणावली येथील हा कचरा उचलून नेण्यास नगरपालिकेने सुरवात केली आहे. याविषयी बाणावली पंचायतीने मडगाव नगरपालिकेविरुद्ध कोलवा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या ठिकाणाहून उचलून मडगाव नगरपालिका हा कचरा कुठे नेऊन टाकते याविषयी मात्र माहिती प्राप्त झाली नाही.

डास पैदाशीची भीती

शहरात अनेक ठिकाणी शहाळ्यांच्या करवंट्यांचे ढीग साचले असून त्यात पाणी साचून राहिल्यास डास पैदास होऊन मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. मागील दोन तीन वर्षांत डेंग्यू, मलेरिया या आजारांचा शहरात फैलाव झाला होता, अशी माहिती मडगाव शहर प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे प्राप्त झाली आहे.

करवंट्या साचलेली ठिकाणे...

मडगाव शहरातील रेल्वे गेट परिसर, व्हिक्टर हॉस्पिटल परिसर, फातोर्डा येथील सुनयना हॉटेल, बोर्डा येथील मल्टिपर्पज हायस्कूल परिसर तसेच नगरपालिकेच्या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी या शहाळ्याच्या करवंट्यांचा कचरा साचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

C K Nayudu Trophy: गोव्याच्या फिरकी गोलंदाजाचा भीमपराक्रम! 77 धावांत 11 गडी बाद; जम्मू काश्मीरचा दारुण पराभव

Goa Politics: 'काँग्रेसने आळस झटकून कामाला लागावे'! सरदेसाईंचा सल्ला; कार्निव्हलमध्ये दिली विजयाची खात्री

Arambol: 'परप्रांतीय घरात घुसले आणि... '! दलाल, बेकायदा गोष्टींमुळे हरमलवासीय संतप्त; कायदा हातात घेण्याचा दिला इशारा

GST: गोवा सरकारकडून 29137 कोटींचा महसूल जमा! राज्‍याला मिळाले 2039 कोटी; महसुलात वाढ

Goa Street Race: 'पुढील 3 वर्षे गोवा स्ट्रीट रेस होत राहील'! CM सावंतांचे प्रतिपादन; पर्यटनाला चालना मिळण्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT