Goa Coconut Rates Dainik Gomantak
गोवा

Coconut Cultivation: परागीभवनातून नारळ उत्पादन

Coconut Farming: यावर्षी ऐन चतुर्थीच्या हंगामात नारळांचे दर गगनास टेकलेले आपणास पाहावयास मिळाले. कोकणात नारळाचे खोबरे जेवणातील प्रत्येक पदार्थात असते.

गोमन्तक डिजिटल टीम

यावर्षी ऐन चतुर्थीच्या हंगामात नारळांचे दर गगनास टेकलेले आपणास पाहावयास मिळाले. कोकणात नारळाचे खोबरे जेवणातील प्रत्येक पदार्थात असते; परंतु गगनास भिडलेले दर पाहून खोबरे खवय्यांना आपल्या रुचींवर आवर घालावी लागली.

माड म्हणजेच नारळ हे एक गोव्यातील प्रमुख पीक. साधारणतः २६,००० हेक्टर क्षेत्रावर नारळ लागवड दिसून येते. कुळागरातील नारळ हे प्रमुख पीक. गोव्यातीलही नारळाचे उत्पादन प्रामुख्याने घटलेले दिसून येते.

यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात. प्रामुख्याने वातावरणातील बदल तसेच वेगवेगळ्या नवीन कीड व रोगांचा प्रादुर्भाव, वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचा अभाव, याचबरोबर एक मुख्य घटक ज्याचा अप्रत्यक्षरित्या उत्पादनवाढीवर परिणाम होतो ते म्हणजे परागीभवन करणारे कीटक.

माड हे एक क्रॉस पॉलिनेटेड (परंपरागत) पीक आहे. मधमाश्‍या प्रामुख्याने परागीभवनाचे काम करतात; परंतु वाढत्या प्रदुषणामुळे गेल्या दोन दशकात तीस प्रतिशतहून अधिक मधमाश्‍यांची संख्या कमी होत चालली आहे. गोव्यामध्ये आपणास चार प्रजाती दिसून येतात.

लहान मधमाशी, सातोडे (भारतीय मधमाशी), आग्या (रॉक) मधमाशी आणि डंखरहित मधमाशी. गोव्यामध्ये डंखरहित मधमाश्‍या पारंपरिक पद्‍धतीने पोषलेल्या दिसून येतात.

सांगे, धारबांदोडा, केपे, काणकोण या तालुक्यांमध्ये या मधमाश्‍यांच्या वसाहती शेतकऱ्यांनी बांबूच्या तुकड्यामध्ये, वेगवेगळ्या लाकडांच्या ओंडक्यात, मातीच्या बुडकुल्यांमध्ये जतन करून ठेवलेल्या दिसतात.

या डंखरहित मधमाश्‍या परागीभवनाचे काम करतात. त्यामुळे नारळपिकाचे उत्पादन वाढते. परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे या प्रजातींचा जीव धोक्यात आला आहे.

या वसाहती आपणास जिवंत झाडांच्या बुंध्यामध्ये, घरांच्या भिंतीमध्ये, जुन्या लाकडांमध्ये, दगडांमध्ये, नैसर्गिकरित्या पाहावयास मिळतात. शेतकरी या वसाहती मध उत्पादनासाठी जतन करतात; परंतु मध उत्पादनापेक्षा परागीभवनामुळे होणारा फायदा जास्त असतो, हे खूप कमीच लोकांना माहिती आहे.

गोवा कृषी महाविद्यालयाच्या अभ्यासानुसार गोव्यामध्ये या डंखरहित मधमाशीच्या दोन जाती व तीन प्रजाती अस्तित्वात आहेत.

या नैसर्गिक देणगीचे जतन केल्यास आपणास नारळ उत्पादन वाढीस फार मोठी मदत होईल. डंखरहित मधमाशीची वसाहत बहुवार्षिक आहे.

एकाच जागी वर्षानुवर्षे दिसून येते. तसेच जास्त काळजी घ्यावी लागत नाही. ही मधमाशी नारळ पिकांमध्ये परागीभवन घडवून नारळाची गुणवत्ता सुधरवते, पडझड कमी होते तसेच कुळागरातील इतर पिकांमध्ये परागीभवन घडवून आणते.

गोव्यामध्ये डंखरहित मधमाश्‍यांच्या वसाहतींची संख्या वाढवून आपण नारळपिकांचे उत्पादन वाढवू शकतो. याच अनुषंगाने गोवा कृषी महाविद्यालयाचा कीटकशास्त्र विभाग या मधमाश्‍यांवर वेगवेगळे संशोधन करत आहे. तसेच शेतकऱ्यांना या मधमाश्‍यांचे महत्त्व पटवून त्यांचे जतन करण्याचे आवाहन केले जात आहे.

- प्रा. राजन शेळके, गोवा कृषी महाविद्यालय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

Devachi Punav: तरंगांची होणारी शारदीय चंद्रकळेच्या आल्हाददायक प्रकाशातली भेटाभेट, ‘देवाची पुनाव'

SCROLL FOR NEXT