Coconut Price Hike  Dainik Gomantak
गोवा

Coconut Price: 'नारळ' अजूनय म्हारगलो! मार्च अखेरीपर्यंत भडका राहणार कायम

Coconut Price Hike: राज्यात मागील महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा भासत असून राज्यातील शहरी भागासहित ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नारळाचे दर वाढले आहेत.

Sameer Panditrao

Coconut prices rising in Goa

पणजी: राज्यात मागील महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा भासत असून राज्यातील शहरी भागासहित ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात नारळाचे दर वाढले आहेत. मध्यम आकाराच्या नारळाची १०० रुपयांना तीन या दराने पणजी बाजारात विक्री केली जात आहे.

सर्वसाधारणपणे एक मध्यम आकाराचा नारळ ४० रुपये प्रतिनग दराने विकला जात आहे. राज्यातील सर्वच भागात अजूनही नारळाचे दर भडकलेलेच आहेत. येत्या काळात सण-उत्सव तसेच इतर कार्यक्रमांनिमित्त नारळांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे.

आता कुठे नारळाचा नवा पाडा उतरायला सुरुवात झाली आहे. येत्या मार्च अखेरीपर्यंत राज्यात नव्या पाड्याचे नारळ उपलब्ध असतील तोपर्यंत हा नारळाच्या महागाईचा भडका कायम राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

दरम्यान, राज्यात इतर भाज्या जसे की, कांदा, बटाटा प्रतिकिलो ५० रुपयांना विकले जात आहेत. हिरवी मिरची, बिन्स प्रतिकिलो १२० रुपये दराने विकली जात आहे. मात्र, भडकलेल्या लसणीचे दर चढेच असून आजही ३५० ते ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. फळभाज्या तसेच इतर भाज्यांचे दर महिन्याभरापासून स्थिर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT