Coconut Price Hike  Dainik Gomantak
गोवा

Coconut Market Goa: खोबऱ्याच्या बाबतीत करावी लागणार काटकसर; नारळाचे दर इतक्या रुपयांनी वाढले

Coconut Price Hike in Goa: विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नारळाचे दर १० ते १५ रुपयांनी महागले आहेत

Akshata Chhatre

पणजी: गोव्यातील लोकांचे ताट हे नारळाशिवाय अपूर्ण आहे. सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचं जेवण आपल्याकडे प्रत्येक पदार्थात खोबरं हे आवर्जून टाकलं जातं. दिवसेंदिवस वाढणारी मागणी आणि कमी पुरवठा यामुळे राज्यात नारळाचे दर वाढलेत. पणजी विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या नारळाचे दर १० ते १५ रुपयांनी महागले आहेत.

डिसेंबर महिन्याच्या शेवटी राज्यात नारळ महागला. इथे नारळाच्या आकारानुसार त्याचे दर बदलतात, त्याप्रमाणे सध्या मोठा नारळ ४५ ते ५० आणि लहान आकाराचा नारळ २५ रुपयांना विकला जातोय, तर माध्यम आकाराचा नारळ हा ३५ ते ४० रुपयांच्या किमतीला उपलब्ध आहे.

नाताळ सणानंतर गोव्यात नारळाच्या किमतींनी गगनभरारी घेतलीये. सध्या राज्यात माकडाचा उपद्रव वाढलाय तसेच माडांच्या झाडांना रोगांनी ग्रासलंय त्यामुळे नारळाचं उत्पन्न काम कमी झालं आहे.

गोव्यात नारळ हा अतिशय महत्वाचा घटक असल्याने बाजारातील वाढत्या मागणीमुळे दर वाढले आहेत. शिवाय राज्यात सध्या नारळ पडणाऱ्या पाडेलीचा खर्चही वाढला असल्याने बाजारात हवा तास पुरवठा होत नाहीये. राज्यातील बाकी ठिकाणच्या तुलनेत पणजीत नारळाचे दर सर्वात अधिक आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT