Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: चॉकलेट्स, कॉफी पॅकेट्समधून कोकेनचा व्यवहार! अटकेनंतर संशयित रेश्माचे वकिलांवर लैंगिक शोषणाचे आरोप

Reshma Wadekar drug smuggling case: ड्रग्सप्रकरणी संशयित रेश्‍मा हिच्याशी संबंध असलेल्या व ड्रग्सची माहिती असलेल्या दोन वकिलांनाही चौकशीसाठी बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

Sameer Panditrao

पणजी: चिकोळणा येथील ड्रग्सवरील कारवाईवेळी क्राईम ब्रँचने अटक केलेल्या रेश्‍मा वाडेकर हिने कोकेन थायलंडहून हवाई मार्गाने गोव्यात आणल्याचे चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे विमानतळावरील तपासणी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. या ड्रग्सप्रकरणी संशयित रेश्‍मा हिच्याशी संबंध असलेल्या व ड्रग्सची माहिती असलेल्या दोन वकिलांनाही चौकशीसाठी बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हे दोघेही तिला कायद्याची मदत करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित रेश्‍मा वाडेकर ही ड्रग्स माफियांच्या संपर्कात होती. काही महिन्यांपूर्वी ती थायलंडला गेली होती. तिने थायलंड ते दिल्ली व दिल्ली ते गोवा असा प्रवास केला होता. गोव्यात ती मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली होती. थायलंड येथून येताना तिने कोकेनची चॉकलेट्स व कॉफीची पाकिटे प्रवासी बॅगेत ठेवली होती.

थायलंड येथील तपासणी यंत्रणेत कोकेनचा उलगडा न झाल्याने ती सहीसलामत तेथून सुटली आणि दिल्लीला पोहचली. दिल्लीला तिचे सामान तिला न देता ते थेट गोव्याला जाणाऱ्या विमानातून पाठवण्यात आले. आलेल्या प्रवाशांच्या साहित्याची तपासणी विमानतळावर केली जात नाही. त्यामुळे रेश्‍मा कोकेन घेऊन गोव्यात परतण्यात यशस्वी ठरली होती.

सडा - मुरगाव येथील भागात ही ड्रग्स असलेली चॉकलेटची पॅकेट्स नेण्यासाठी काही ग्राहक रेश्‍मा हिच्याकडे येऊ लागल्याने या चॉकलेट्स व कॉफीची बरीच चर्चा सुरू झाली होती. या भागात क्राईम ब्रँचचे एक अधिकारी राहात असल्याने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचल्यावर त्यांनी यासंदर्भात चौकशी सुरू केली. रेश्‍माची सविस्तर माहिती गोळा करून तिच्यासह इतर साथीदारांना पकडण्यासाठी सापळा रचला. ग्राहक म्हणून एका व्यक्तीला तिच्याशी संपर्क करण्यास सांगितले.

त्यावेळी संशयित रेश्‍मा हिने स्वतः न येता तिच्याच शेजारी राहात असलेल्या निबू व्हिन्सेंट याच्याकडून कोकेनची ही पॅकेट्स पाठविली असता, ही कारवाई करण्यात आली. संशयित निबू व्हिन्सेंट आणि रेश्‍माचा पती मंगेश वाडेकर हा ड्रग्स ग्राहकांपर्यंत पोचवण्याचे काम करायचे, तर ड्रग्सचा व्यवहार रेश्‍मा वाडेकर हाताळत होती, असे चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

चॉकलेटमध्ये ‘ड्रग्स’

संशयित रेश्‍माने कोकेन ड्रग्स हे चॉकलेट्स तसेच कॉपी पॅकेट्समधून लपवून आणले होते. या पॅकेट्समध्ये आतील पोटभागात कोकेनचा वेगळा थर सील करून लपवण्यात आला होता, तर त्यावर चॉकलेट्स व कॉफीचा सुगंध येणारा थर होता. त्यामुळे हे पॅकेट्स उघडल्यावर कोणालाही त्यामध्ये ड्रग्स असल्याचे कळत नव्हते.

चिकोळणात सापळा!

क्राईम ब्रँचने तयार केलेल्या बोगस ग्राहकाने संशयित रेश्‍माशी संपर्क साधून तिच्याकडे असलेली चॉकलेट्स व कॉफीची सर्व पॅकेट्स खरेदी करण्याची तयारी दर्शविली. या सर्व पॅकेट्सची किंमत सुमारे १० कोटी रुपये असल्याचे तिने सांगितले. ही पॅकेट्स चिकोळणा येथून जमा करण्याचे ठिकाण ठरवण्यात आले. त्यानुसार क्राईम ब्रँचने चिकोळणा येथे सापळा रचला.

वकिलांवर लैंगिक शोषणाचे आरोप

संशयित रेश्‍मा हिला यापूर्वी वेश्‍या व्यवसायात अटक झाली होती. तेव्हा तिचे सल्लागार म्हणून हे वकील मदत करत होते. कोकेनप्रकरणी अटक झाल्यानंतर रेश्‍माने या वकिलांवरच लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. त्यांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहे. या वकिलाला तसेच त्याच्या हाताखालील कनिष्ठ वकिलालाही यासंदर्भात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT