Trees Colapses At Galgibaga Beach Dainik Gomantak
गोवा

Galgibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी दिरंगाई का ? तौक्ते वादळानंतरही उपाययोजना नाहीच

Galgibaga: पैंगीण जैवविविधता व्यवस्थापन समितीने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप ठोस कारवाई सुरू झाली नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Galgibaga Coastal Erosion

काणकोण: पावसाळ्यात उंच लाटांच्या माऱ्याने किनाऱ्याची धूप होऊन गालजीबाग समुद्रकिनाऱ्याचा तट धोक्यात आला आहे. धूप झाल्याने समुद्र सुमारे तीन मीटर पुढे आला आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात किनाऱ्याची धूप रोखणारी किनाऱ्यावरील सुमारे तीस सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत. मात्र, अद्याप सरकारने या किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी काहीच उपाययोजना केलेली नाही.

किनाऱ्यावर सुमारे पंधरा सुरूच्या झाडांच्या मुळाकडील रेतीची धूप होऊन मुळे उघडी पडली आहेत. ती झाडे कधीही उन्मळून पडू शकतात. या वृक्षांवर काही अशा सी-ईगलसारख्या पक्षांची घरटी आहेत. त्यासाठी वन खात्याच्या मरिन झोन विभागाने या झाडांच्या मुळाकडील धूप रोखण्यासाठी जाळीचे संरक्षक आवरण बसविले आहे.

हा किनारा सागरी कासवांसाठी आरक्षित केला आहे. दरवर्षी या किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांचे आगमन होऊन ती अंडी घालतात. दक्षिण गोव्यात जे किनारे सागरी कासवांसाठी आरक्षित नाहीत, त्या किनाऱ्यांवर सागरी कासवांची अंडी घातल्यास ती गालजीबाग किनाऱ्यावर स्थलांतरित करतात. असे असताना या किनाऱ्याची धूप रोखण्यासाठी सरकार अद्याप उपाययोजना करण्यात का दिरंगाई करत आहे, हा प्रश्‍न उपस्थित होतो.

ठोस कारवाई नाहीच!

यापूर्वी तौक्ते वादळावेळी या किनाऱ्याची धूप होऊन मोठ्या प्रमाणात सुरूच्या झाडांची पडझड झाली होती. पैंगीण जैवविविधता व्यवस्थापन समितीने ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देऊनही अद्याप ठोस कारवाई सुरू झाली नाही, असे जैवविविधता व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahavatar Narasimha: ‘महावतार नरसिंह’ची गर्जना! एका दिवसात कमावले 'इतके' कोटी; विक्रमी कलेक्शनकडे वाटचाल

Viral Video: हे काय चाललंय! महिलेचा 'हा' व्हिडिओ पाहून तुम्हीही माराल डोक्यावर हात; नेटकरी व्यक्त करतायेत संताप

Accident in Goa: कुंडई औद्योगिक वसाहतीत अपघात; छत दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू!

Goa Crime: प्रेमाचा त्रिकोण! सांगोल्डात युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; प्रियकरासोबत-प्रेयसी फरार

Goa Live Updates: चेन्नई-तामिळनाडू येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा महिला संघ उपविजेता

SCROLL FOR NEXT