Mining In Goa Dainik Gomantak
गोवा

Mining In Goa: खाण कंपन्यांचे खरे रूप

गेली काही वर्षे बंद असलेला खाण उद्योग सुरू होण्याचे संकेत मिळत असतानाच काही खाण कंपन्यांनी नियमावर बोट ठेवून कामगारांच्या भावनांशी खेळण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Mining In Goa: गेली काही वर्षे बंद असलेला खाण उद्योग सुरू होण्याचे संकेत मिळत असतानाच काही खाण कंपन्यांनी नियमावर बोट ठेवून कामगारांच्या भावनांशी खेळण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून डिचोलीत खाण कामगार संतप्त होऊन या कंपनीला परवानगी न देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

त्यामुळे खाण उद्योग सुरू होणार या अपेक्षेत असलेल्यांना झटका बसला आहे. काहींच्या मते यात खाण कंपन्यांचा तर अन्य काहींच्या मते कामगारांचा मस्तवालपणा कारणीभूत आहे. दोघांना एकत्र आणून ही समस्या सामोपचाराने सोडविली नाही तर मागील पानावरून पुढे असेच हे नाट्य चालणार असे म्हटले जाते.

सावईकर भेटले एल्टनना

सध्या दक्षिण गोव्यातील राजकारण वेगळेच वळण घेत आहे असे वाटते. कारण भाजपची दक्षिण गोवा उमेदवारी कुणाला मिळेल यात चढाओढ चालू असून बाबू विरुद्ध सावईकर असे चित्र निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती असताना काल फातर्पा येथे किटलकरीण संस्थानच्या जत्रेला सावईकर यांनी भेट दिली.

ही जागा म्हणजे बाबू कवळेकर यांचा बालेकिल्ला. मात्र सावईकर यांनी कित्येकांची भेट घेतली. त्यातील सर्वात महत्वाची भेट म्हणजे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची. त्यांच्याबरोबर ‘जाल’ फॅक्टरीचे मालक गोविंद देसाई हेही उपस्‍थित होते. सावईकर यांची ही भेट बरेच काही सांगून जाणारी आहे.

‘हाथसे हाथ जोडो नव्हे, पकडो’

गोव्यात सध्या काँग्रेसची स्थिती ‘धरले तर चावते व सोडले तर पळते’ अशी झाली आहे. त्यामुळे काँग्रेसवालेही काही गांभीर्याने घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी या पक्षाने ‘हाथ से हाथ जोडो’ या उपक्रमास सुरवात केली.

राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ची ही छोटी आवृत्ती मानली जाते. पण ‘हात से हात जोडो’ नेमके काय प्रकरण आहे ते कोणालाच माहीत नाही. एकमेकांचे हात धरून तसेच राहायचे का, की काय? असा प्रश्न आता चेष्टेने कला जाऊ लागला आहे.

या कार्यक्रमासाठी जो मतदारसंघ निवडला, तोही काँग्रेसकडून ‘आप’ने बळकावला. एकेकाळी तो काँग्रेसचा बालेकिल्ला, पण आता तो ढासळलाय. मग तेथून हा उपक्रम सुरू करून काय साध्य केले, अशी विचारणाही होताना दिसते. तर, काही उरलेले नेते निसटू नयेत म्हणून हा हात पकडण्याचा कार्यक्रम असल्याचे काँग्रेस विरोधक सांगतात. आता बोला.

बाबूशचे नो कमेंटस्‌

पणजी महापालिका क्षेत्रातील रायबंदर डोंगराळ भागात सुरू असलेल्या डोंगरकापणीबाबत पणजीचे आमदार व महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आजपर्यंत काहीच प्रतिक्रिया व्‍यक्त केली नव्‍हती.

चोडण येथून फेरीबोटीने रायबंदर येथे येताना समोरील डोंगराळ भागात मातीचा भराव टाकून सपाटीकरण होत असल्याचे रॉड्रिगीस यांनी उघडकीस आणून दिल्यावर नगरनियोजनमंत्री राणे यांनी दखल घेत ते काम बंद ठेवले आहे. पणजी महापालिकेचा या प्रकरणाला आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही. विशेष म्‍हणजे महापालिकेवर कब्जा असलेल्या मंत्र्यांनीही कारवाईनंतर त्यावर बोलणे टाळले आहे.

या डोंगराळ भागात मातीचा भराव टाकण्‍याचा परवाना दिला असला तरी त्याचे उल्लंघन केले असल्याचे कारण दिले जात आहे. याविरोधात कोणी आवाज उठविला नसता तर तेथील बेकायदा काम गुपचूपणे पूर्णही झाले असते.

सरकारी यंत्रणा निद्रितावस्थेत असल्याचे नेहमीच सोंग घेत असते. त्यामुळेच लोकांना पर्यावरण वाचविण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागते. आमदार व मंत्री मात्र लोकांची धूळफेक करण्यासाठी फक्त पर्यावरण वाचविण्याची वक्तव्ये करतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना मनातून ते हवेच असते. त्यामुळेच तर काही मंत्री या प्रकरणापासून दूर राहतात.

दोनापावला जेटीला मुहूर्त मिळेना!

जगाच्या नकाशावर गोवा हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे व येथील दोनापावल जेटी पाहण्यासाठी देश-विदेशांतून लोक येत असतात. या ठिकाणी डोना-पावला यांची दगडाची प्रतिकृती आहे. त्या ठिकाणी देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात फोटो काढतात. आज ही दोनापावला जेटी बांधकामासाठी बंद ठेवण्यात आली आहे.

कोविड महामारीपूर्वी ती पर्यटकांसाठी बंद करण्यात आली होती, ती अजून तशीच आहे. या जेटीचे काम पूर्ण झाल्याचे व लवकरच ती पर्यटकांसाठी तसेच स्थानिकांसाठी खुली केली जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे तसेच स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी अनेकदा केली. मात्र अजूनही ती खुली करण्यात आलेली नाही.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच नव्या झुआरी पुलाचा एक मार्ग खुला झाला, पण दोनापावला जेटी अजूनही खुली होत नसल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. गोव्यात येणारे पर्यटक हे गोव्याच्या नकाशावर दोनापावला हे स्थळ शोधत येतात, परंतु तेथे आल्यावर त्यांना हात हलवत माघारी फिरावे लागते. ही जेटी पर्यटकांसाठी खुली होणार तरी कधी? असा प्रश्‍न भेडसावत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: अतिक्रमणे हवटण्यासाठी राबवण्यात येणार विशेष मोहीम; रुमडामळ ग्रामसभेत ठराव!

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Goa Crime: वेश्या रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील चौथा आरोपी अटकेत; गोवा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT