Konkan Railway Cancelled : कोकण रेल्वेने पलक्कड विभागातील जोकट्टे आणि पडिल स्थानकांदरम्यान नियोजित केलेल्या मुख्य ट्रॅकच्या देखभाल कामामुळे 3 मार्चपर्यंत या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे.
या कालावधीत किमान 19 गाड्या पूर्णपणे रद्द, चार शॉर्ट टर्मिनेट आणि एक गाडी वळवली जात आहे.
मेंटेनन्स ऑपरेशन्समध्ये नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामे आणि संपूर्ण ट्रॅक नूतनीकरण (CTR) करण्यात येणार आहेत.
तसेच दक्षिण रेल्वेने दोन स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक/पॉवर ब्लॉक चालवण्याची योजना देखील आखली आहे, असे कोकण रेल्वेने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे.
एनआय वर्क म्हणजे पॉइंट्स, सिग्नल्स, ट्रॅक सर्किट्स, एक्सल काउंटर आणि इतर सिग्नलिंग उपकरणांचे तात्पुरते डिस्कनेक्शन, CTR कामामध्ये, संपूर्ण ट्रॅक म्हणजेच रेल, स्लीपर आणि बॅलास्ट बदलले जातात.
इतर सर्व गाड्या ज्यांचा प्रवास या कालावधीत सुरू होत आहे त्यांचे नियमन त्यांच्या धावण्याच्या दरम्यान योग्यरित्या केले जाईल, असे प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.