Transport trucks Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : कोळसा, बॉक्साईटचे 200 ट्रक रोखले; संतप्त मुरगावकरांचा एल्गार

मुरगाव वासियांचे मुरगाव बंदरातील नऊ नंबर गेट समोर आंदोलन

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मुरगाव पत्तन प्राधिकरणाच्या बंदरातील कोळसा व बॉक्साईट मालाच्या विरोधात मुरगाव वासियांनी वास्को येथील मुरगाव बंदरातील नऊ नंबर गेट समोर आंदोलन छेडले. कोळसा आणि इतर मालवाहतूक रोखण्यासाठी स्थानिकांची गर्दी झाल्याने एमपीए गेटवर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

मुरगाव - वास्को वासियांना होत असलेल्या कोळसा प्रदूषणाचा फटका मुरगाव बंदरातील बॉक्साईड मालाच्या जहाजाला बसला. सदर बॉक्साईड मालवाहू ट्रकद्वारे मुरगाव बंदर वास्को मार्गे कर्नाटक कारवार येथे जाणार होते. परंतु मुरगाव सडा येथील काही समाजिक कार्यकर्त्यांनी व इतरांनी नऊ नंबर गेट मधून बॉक्साईड मालवाहू ट्रक बाहेर येऊ दिले नाही. त्यामुळे २०० हून अधिक कोळसा व बॉक्साईट मालाने भरलेले ट्रक गेटच्या आतच राहिले. कायदा सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी मुरगावचे मामलेदार रंजित साळगावकर, पोलिस उपअधिक्षक शेख सलीम, मुरगाव पोलिस स्थानकांचे निरीक्षक राघोबा कामत, वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक व मुरगाव पत्तन प्राधिकरणाचे सुरक्षा रक्षक, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान मोठ्या संख्येने नऊ नंबर गेट समोर उपस्थित होते.

बंदरातील कोळसा, बॉक्साईड व इतर सर्व माल नवीनच केलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून जाणे महत्वाचे आहे. मी या विषयावर मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए)च्या अधिकार्‍यांना पुर्वीच सांगितले आहे. शहरातील रस्ते अवजड वाहनासाठी पुरेसे नसल्याने तसेच वाढत असलेल्या अपघातांमुळे बंदरातील मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्गावरून वळवीणे गरजेचे आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे असे वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT