CMs gift to goan women Free 3 LPG cylinders per year Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील महिलांना मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट; वर्षाला 3 LPG सिलिंडर मिळणार मोफत

ही योजना लवकरच होणार कार्यान्वित

दैनिक गोमन्तक

Goa : आज प्रमोद सावंतांसह 8 मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. वाळपईचे आमदार विश्वजीत राणेंचं नाव या मंत्र्यांच्या यादीत सर्वात आघाडीवर आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 7 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहिले.

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी पूर्ण होताच नव्या सरकारमधील मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी खूप मोठी घोषणा केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या एप्रिलपासून गोमंतकीय जनतेला वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय असून ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे. (CM's gift to women in Goa; Free 3 LPG cylinders per year)

याआधी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, गोव्यामध्ये स्वयंपूर्ण गोवा 2.0, स्वयंपूर्ण गोवा, सरकार तुमच्या दारी, स्वयंपूर्ण युवा आणि स्वयंपूर्ण महिला या मोहिमांसह गोव्यातील तरुणांना नोकऱ्या (Goa Jobs) निर्माण करण्यावर भर देणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे.

त्याचबरोबर गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याचा निर्धार या कार्यकाळात पूर्ण करणार असून लवकरात लवकर खाण व्यवसाय सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. रोजगार निर्मिती करून राज्यातील पर्यटनाला आणखी बळकटी देण्याची हमी त्यांनी जनतेला दिली आहे. ते पुढे म्हणाले की, जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने भाजप सरकार (BJP Government) पूर्ण करणार आहे.

दरम्यान, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर विश्वजीत राणे, मॉविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, रोहन खंवटे आणि बाबूश मोन्सेरात यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT