CM sawant Account Hack  Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: CM सावंतांचं ईमेल अकाऊंट हॅक होताच खळबळ, 4 ते 5 तासांच्या आता 'रिकव्हर'; पोलिसांकडून शोध सुरु

Email Account Hacking: मुख्यमंत्र्यांचा अकाउंट रिकव्हर करण्यात आला आणि रिकव्हर केलेल्या अकाउंटमध्ये कुठलेही हानी दिसून आली नाही, मात्र सध्या सायबर पोलीस याचा तपास करीत आहेत.

Akshata Chhatre

पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचा ई-मेल अकाउंट शनिवारी (३० नोव्हेंबर) अचानक हॅक झाला. मुख्यमंत्र्यांचा अकाउंट हॅक झाल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केवळ ४ ते ५ तासांच्या आत हा अकाउंट रिकव्हर करण्यात आला आणि रिकव्हर केलेल्या अकाउंटमध्ये कुठलेही हानी दिसून आली नाही. सध्या सायबर पोलीस हॅकर्सनी कोणते ईमेल पाठवले आहेत का, वैयक्तिक ॲक्सेस मिळवला आहे का किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर व्यवहार केले आहेत का याचा तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा ई-मेल युट्युबशी जोडलेला आहे. अकाउंट हॅक झाल्याची बातमी मिळताच सायबर पथकाने घटनेचा तपास केला.

सध्या मुख्यमंत्र्यांच्या ई-मेल अकाउंटची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तसेच कोणताही गैरवापर टाळण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात असल्याची माहिती सायबर अधिकाऱ्यांनी द गोवन या इंग्रजी वृत्तपत्राला दिली.

यापूर्वी २०२१ मध्ये मुख्यमंत्र्यांचा फेसबुक अकाउंट हॅक झाला होता आणि त्यावेळी हॅकर्सनी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी आर्थिक मदत मागत काही लोकांना संदेश पाठवले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT