CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: गोव्यात फेब्रुवारीत होणार योग महोत्सव; योगगुरू बाबा रामदेव यांना निमंत्रण

मुख्यमंत्र्यांची माहिती; गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी घेतली हरिद्वारच्या संतांची भेट

Akshay Nirmale

CM Pramod Sawant: गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तराखंड दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी तेथील संतांची भेट घेतली. गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सावंत यांनी ही भेट घेतल्याचे समजते.

येथील पतंजली केंद्राच्या भेटीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, "देवाच्या भूमीत आल्यानंतर खूप बरे वाटत आहे. मी पतंजलीमध्ये सर्वात आधी पोहोचलो. योगगुरू बाबा रामदेव यांची भेट घेतली. योग करण्यासोबतच मी योगासन संशोधन केंद्रही पाहिले.

गोव्यात गोव्यात 18, 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी मिरामार बीचवर योग महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांना आमंत्रित केले आहे.

जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी यांची भेट घेतल्यानंतर सावंत म्हणाले, "आम्हाला गोव्याला अध्यात्मिक पर्यटनाशी जोडायचे आहे. गोव्यात सागरी पर्यटन आधीपासूनच आहे. गोव्यात आध्यात्मिक आरोग्य आणि वैद्यकीय पर्यटनाला चालना द्यायची आहे.

म्हणूनच आज आम्ही स्वामी अवधेशानंद गिरी यांची भेट घेतली. त्यांना 'अपनी कथा' आयोजित करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना मानणारा संपूर्ण संप्रदाय गोव्यात येईल.

मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियातूनही या भेटीची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, या भेटीत भारतीय संस्कृतीच्या अनुषंगाने शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि शिक्षण व्यवस्थेने प्रभावित झालो. गुरुकुलमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि भक्ती पाहून आनंद झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT